FRRO Goa Crackdown 2026 Dainik Gomantak
गोवा

अवैध वास्तव्याप्रकरणी 9 विदेशींवर कारवाई; 7 रशियन, 2 युक्रेनियन नागरिकांचा समावेश

FRRO Goa Crackdown 2026: बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरुद्ध ‘फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिस’च्या (एफआरआरओ) विशेष कृती दलाने कारवाई केली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्यात व्हिसाची मुदत संपल्यानंतरही बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरुद्ध ‘फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिस’च्या (एफआरआरओ) विशेष कृती दलाने कारवाई केली.

या मोहिमेअंतर्गत एकूण ९ परदेशी नागरिकांचा शोध लावण्यात आला असून, त्यात ७ रशियन आणि २ युक्रेनियन नागरिकांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शोध घेण्यात आलेल्या ७ रशियन नागरिकांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.

या ९ जणांपैकी २ रशियन नागरिकांनी आधीच भारत सोडून मायदेशी प्रयाण केले आहे. उर्वरित परदेशी नागरिकांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू असून, त्यांच्यासाठी 'एक्झिट परमिट' आणि व्हिसा बदलाबाबतचे अर्ज प्रक्रियेत आहेत.

‘एफआरआरओ’च्या पोलीस अधीक्षक अर्शी आदिल यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई केली. तसेच पोलिस अधीक्षक/उपअधीक्षक ब्राझ मिनेझिस यांनी या मोहिमेवर प्रत्यक्ष लक्ष ठेवले होते. प्रत्यक्ष क्षेत्रीय कारवाईचे नेतृत्व पोलिस निरीक्षक देवेंद्र, उपनिरीक्षक पराग पारेख आणि आयआरबीएनच्या पथकाने केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa North: न्याय देत नसाल तर विष द्या ! पळसकट्टा, येथील धनगर समाज महिलांचा प्रकल्पाविरोधात संताप

Mandovi River: चोडण येथील बांध कोसळतोय! दुरुस्तीची मागणी,'मांडवी'चे पाणी फुटण्याचा धोका

Goa Weather Update: गोव्याला अवकाळी पावसाने झोडपले! उकाड्यापासून सुटका, वातावरणात पसरला गारवा

Bicholim Fire: डिचोलीत भरदिवसा फ्लॅटला आग; जीवितहानी टळली, दागिन्यांसह पंधरा लाखांचा ऐवज भस्मसात

Baina Fish Market: बायणा मासळी मार्केटची दुरवस्था; घाऊक विक्रेत्यांना हलवण्याच्या हालचालींवर स्थानिकांचा आक्षेप

SCROLL FOR NEXT