Goa Freedom Fighter Dainik Gomantak
गोवा

Goa Freedom Fighter : देशभक्त जॉर्ज यांना 14 ऑगस्ट रोजी घेतले ताब्यात

करमणे गावचे सुपुत्र ; ख्रिश्‍‍चन असूनही प्रखर देशभक्त असल्‍यामुळे पोर्तुगीज झाले होते संतप्‍त

दैनिक गोमन्तक

सुशांत कुंकळ्येकर

मडगाव : 14 ऑगस्ट 1947 च्या रात्री लाल किल्ल्यावरील युनियन जॅक खाली उतरवून भारतीय तिरंगा वर चढणार याची उमळशिक गोवेकरानाही लागली होती. भारताचा स्वातंत्र्यदिन गोव्यात उल्हासाने साजरा करण्याची तयारी क्रांतिकारक करीत होते. पोर्तुगीजाना तेच नको होते. म्हणून भारत स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला गोव्यात पुन्हा एकदा धरपकड सुरू झाली.जाज्वल्य देशप्रेमी इव्हाग्रियु जॉर्ज यांना त्या दिवशी अटक झाली.

(Goa Freedom Fighter)

जॉर्ज हे सासष्टीतील करमणे या गावचे. ते ख्रिश्चन असूनही देशभक्त असल्याने पोर्तुगीज सरकार त्यांच्यावर अधिक नाराज होते. 14 ऑगस्ट 1947 या दिवशी जॉर्ज बेळगावहून आपल्या घरी येणार याची माहिती मिळाल्यावर उत्तम देसाई या उपनिरीक्षकाला त्यांची अटक करण्यासाठी त्यांच्या घरी पाठविले गेले. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ते घरी आले असता त्यांना दारातच अटक करण्यात आली. त्यावेळी ते फक्त 22 वर्षांचे होते.

त्‍यांच्‍या अटकेमागे एकमेव कारण म्हणजे ते ख्रिश्चन असूनही प्रखर देशभक्त होते आणि पोर्तुगीजांना तेच जास्त खुपत होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात सबळ पुरावा मिळावा, यासाठी त्यांच्या घराची झडतीही घेण्यात आली. पण घरात मिळाले ते फक्त पंडित नेहरूंनी लिहिलेले पुस्तक, काही फोटो आणि काही कागदपत्रे.

‘पोर्तुगीजांचे राज्य म्हणजे गोव्याचे निसंतान’

18 जून 1946 रोजी मडगाव येथे डॉ. लोहिया यांची ऐतिहासिक सभा झाली, त्या सभेलाही जॉर्ज हजर होते म्हणून त्या दिवशीही त्यांना मडगाव कोठडीत डांबून ठेवले होते. त्यानंतर त्यांनी ‘पोर्तुगीजांचे राज्य म्हणजे गोव्याचे निसंतान’ नावाची कोकणी भाषेतून पुस्तिका लिहिली. त्यांनी लिहिलेली ही पुस्तिका, अन्य लेख हे पोर्तुगीज सत्ते विरोधात केलेला उठाव, असे नमूद करून सैनिकी न्यायालयाने त्यांना पाच वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा देतानाच त्यांचे नागरी हक्क 15 वर्षासाठी निलंबित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

America Iran War: 6 महिन्यांत 3.21 लाख कोटींची राखरांगोळी, फायटर जेट्स उद्ध्वस्त, अमेरिकन दूतावासांवर हल्ले; पेंटागनच्या ऑडिट रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Horoscope 16 September 2026: नशिबाची साथ अन् अचानक जॅकपॉट! आज 'या' राशींच्या आयुष्यात घडणार मोठी उलथापालथ; करिअरमध्ये झेप घेण्याची संधी

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

SCROLL FOR NEXT