Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Free Water Scheme: सरकारची ही कृती गोमंतकीय विरोधी! मोफत पाणी योजना बंदीवरून सरदेसाईंचा सरकारवर घणाघात

Vijai Sardesai: राज्य सरकारने पाणी मोफत देणारी योजना १ मे पासून स्थगित केली आहे. यासंदर्भात गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारवर टीका केली.

Sameer Panditrao

सासष्टी: राज्य सरकारने महिना १६ हजार लिटरपर्यंत पाणी मोफत देणारी योजना १ मे पासून स्थगित केली आहे. यासंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारवर टीका केली. ही योजना बंद करून सरकारने लोकविरोधी अजेंडा उघड केल्याचे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

या योजनेचा फायदा ४८ टक्के ग्राहकांना होत असे. आता त्यांना पूर्वीप्रमाणे पाण्याचे बिल भरावे लागेल. ही योजना आकस्मिक स्थगित करण्याचा निर्णय म्हणजे गोव्यातील गरीब व गरजू लोकांप्रती सरकार असंवेदनशील असल्याचे दाखवून देणे असाच त्याचा अर्थ होतो. त्याचप्रमाणे अशा लोकांच्या कल्याणाकडे दुर्लक्षित करते हे सरकारने दाखवून दिले आहे, असेही सरदेसाई यानी म्हटले आहे.

Water Shortage

यापूर्वी सरकारने लोकांना ३ एलपीजी गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, या आश्र्वासनाची पूर्तता सरकार करू शकले नाही. मोफत पाण्याची योजना बंद केल्याने जे लोक आर्थिक संकटातून जात आहेत त्यांच्यावर विपरीत परिणाम होणार आहे, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

लोकांसाठी जास्तीत जास्त कल्याणकारी योजना सुरू करण्याऐवजी सरकार सुरू केलेल्या योजनाच बंद करीत आहे. सरकारची ही कृती अन्यायकारक, अक्षम्य व गोमंतकीय विरोधी असल्याचेही सरदेसाई यांनी शेवटी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT