Goa Fraud Case Dainik Gomantak
गोवा

Share Market Fraud in Goa : शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Fraudster absconds to London after 100 crore stock market scam: राज्यात सध्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणावरुन सावळा गोंधळ माजला आहे. सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने अनेक गोमंतकीय तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला.

Manish Jadhav

पणजी: राज्यात सध्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणावरुन सावळा गोंधळ माजला आहे. सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने अनेक गोमंतकीय तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला. यातच आता, अशाचप्रकारचे एक प्रकरण समोर आले आहे. इथे कोट्यवधी रुपयांना गंडा घालण्यात आला, मात्र इथे आमिष सरकारी नोकरीचे नव्हते.

शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने कोट्यवधी रुपये लाटण्यात आले. मायरॉन रॉड्रिग्ज आणि त्याची पत्नी दीपाली परबसह 7 जणांविरुद्ध गोवा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. रॉड्रिग्ज आणि दीपाली नुवे येथील रहिवाशी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मायरॉन आणि दीपाली यांच्याविरोधात आम्हाला 38 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. 50 हून अधिक गुंतवणूकदारांना या दोघांनी तब्बल 100 कोटींना गंडवले. फसवणूक झालेले लोक सासष्टीमधील आहेत. तक्रारदार 2011 पासून गुंतवणूक (Investment) करत होते मात्र, त्यांना त्यांच्या गुंतवणूकीचा परतावा मिळाला नाही. आरोपी मायरॉनने गुंतवणूकदारांना 'स्टॉक ब्रोकर' तर दीपालीने 'आर्थिक तज्ज्ञ' म्हणून ओळख करुन दिली होती.

दरम्यान, हा घोटाळा उघड होताच पोलिसांनी तात्काळ मायरॉन आणि दीपाली यांना नोटीस बजावली. मात्र मायरॉन फरार झाल्याचे कळत आहे. तो भारतातून (India) दुबईमार्गे लंडनला गेल्याची माहिती गुप्तहेरांकडून पोलिसांना मिळाली आहे. एलओसी आणि इंटरपोलद्वारे आरोपी मायरॉनविरुद्ध ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली असून त्याला गोव्यात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, अशी माहीती पोलिसांकडून यावेळी देण्यात आली.

मायरॉनने 2021 मध्ये पहिली पत्नी सुनीता रॉड्रिग्ज हिला घटस्फोट देवून दीपाली परबशी लग्न केले होते. पोलिसांनी पुढे सांगितले की, मायरॉन आणि दीपाली यांची सहा लाखांची रोकड असलेली मुदत ठेव खाती गोठवण्यात आली आहेत. मायरॉन, सुनिता आणि दीपाली यांच्या मालकीच्या 8 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. ईडीलाही याबाबत कळवण्यात आले आहे. मायरॉन आणि दीपाली यांच्याकडे 7 प्लॅट, 1 व्हिला असून बाजारभावानुसार त्याची किंमत 3.5 कोटी एवढी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT