साखळी: साखळी येथील पुरातन किल्ल्याच्या (fort) नुतनीकरणचा पायाभरणी सोहळा मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज झाला. यावेळी नगरसेवक दयानंद बोर्येकर, शुभदा सावईकर, यशवंत माडकर व इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.या पुरातन किल्ल्याच्या नुतनीकरणामुळे साखळीच्या सौदर्यिकरणात भर पडणार आहे.
या किल्ल्याचे नुतनीकरण होऊन या ऐतिहासिक पुरातन वास्तूचे जतन व्हावे अशी साखळीवासियांची गेल्या कित्येक वर्षांची प्रलंबित मागणी होती. गोवा पर्यटन खाते, साधन सुविधा महामंडळ, गोवा पुरातत्व खाते यांच्या संयुक्तविद्यमाने सदर पुलाचे काम करण्यात येणार आहे. सरकार व साखळी पालिका परस्पर विरोधात असले तरी साखळीतील या पुरातन किल्ल्यासाठी एकत्र आले होते.
या पुरातन किल्ल्याचे नुतनीकरण (Renewal) व्हावे यासाठी साखळी पालिकेतर्फे या पुरातन किल्ल्याच्या नुतनीकरणासाठी असलेल्या सर्व अडचणी माजी नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांनी दुर केल्या होत्या. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली सर्व दुकानांचे स्थलांतर साखळी पालिकेच्या काडा मार्केटात नवीन दुकाने उपलब्ध करुन स्थलांतर केले होते.शासकीय पातळीवर या किल्ल्याच्या नुतनीकरण काम लवकर सुरु व्हावे यासाठी मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी प्रयत्न केले. कोविडमुळे या कामाला विलंब लागला होता.
या किल्ल्याच्या नुतनीकरणामुळे साखळीच्या सौदर्यांत भर पडणार आहे.18 महिन्यात या नुतनीकरणाचे काम पुर्ण होणार आहे.या ठिकाणी ऐतिहासिक माहिती देणारा विभाग, ग्रंथालय, नागरिकांना विसावा घेण्यासाठी बसण्याचे पार्क, छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) अर्धपुतळा वगैरे व्यवस्था करण्यात येईल.हा प्रकल्प पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार, साखळी बाजाराचे सौंदर्य वाढवणार तसेच बाजार परिसराला पुन्हा एकदा उर्जितावस्था आणण्यस मदत करील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.