FAR Rules Controversy Dainik Gomantak
गोवा

FAR Rules Controversy: 'नोट 2' मागे घेतली, पण आधीच्या बांधकामांचे काय? गोवा फाऊंडेशनचा सरकारला सवाल

Goa Foundation FAR Petition: न्यायालयाने या प्रकरणावर १९ जानेवारी २०२७ रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: वाढीव ‘फ्लोअर एरिया रेशो’ (एफएआर) देण्याविरोधात दाखल झालेल्या जनहित याचिकांच्या समूहामध्ये उपस्थित केलेले आक्षेप व तक्रारींचे निवारण करण्यासाठी ‘गोवा जमीन विकास आणि इमारत बांधकाम (सुधारणा) नियमावली, २०२६’ मध्ये दुरुस्ती करून ती अधिसूचित केल्याची माहिती गोवा सरकारने गोवा खंडपीठात सादर केली आहे. न्यायालयाने या प्रकरणावर १९ जानेवारी २०२७ रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे.

बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सरकारने ‘नोट २’ मागे घेतल्याचे जाहीर केले. नगरनियोजन विभागाला आपल्या मर्जीनुसार कुठेही अतिरिक्त ‘एफएआर’ आणि उंची देण्याचा अधिकार देणारी हीच ती वादग्रस्त तरतूद होती. तिच्या जागी आता नव्या ‘नोट ३’ अंतर्गत मार्गदर्शक तत्त्वांनुसार अतिरिक्त एफएआर आणि उंची देण्याची तरतूद करण्यात आली आहे. ही अधिसूचना सुनावणी सुरू होण्याच्या केवळ काही मिनिटे आधी याचिकाकर्त्यांच्या वकिलांना देण्यात आली.

नगरनियोजन विभागांमार्फत दिल्या जाणाऱ्या वाढीव एफएआर आणि इमारतींच्या उंचीच्या सवलतींना आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर गोवा खंडपीठात सुनावणीवेळी ही दुरुस्त केलेली अधिसूचना सादर करण्यात अली. राज्य सरकारने या प्रकरणाचा मुख्य आधार असलेली ‘नोट २’ ही तरतूद मागे घेतली असून, त्याऐवजी नवी ‘नोट ३’ आणि मार्गदर्शक तत्त्वांची अधिसूचना जारी केली आहे. या पार्श्वभूमीवर याचिकाकर्त्या ‘गोवा फाउंडेशन’च्या ज्येष्ठ ॲड. नोर्मा अल्वारिस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सरकारच्या या नव्या अधिसूचनेवर आक्षेप नोंदवत अनेक कायदेशीर व तांत्रिक प्रश्न उपस्थित केले आहेत.

बांधकामांमुळे नुकसान : सबिना

वाढीव ‘एफएआर’ मुद्द्याला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकांवरील न्यायालयीन सुनावणीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ‘गोवा बचाव अभियान’तर्फे सबिना मार्टिन यांनी सांगितले की, सरकारने न्यायालयात सादर केले आहे की त्यांनी काल एक अधिसूचना जारी करून हा जुना नियम रद्द केला आहे. या नियमांतर्गत देण्यात आलेल्या सर्व बांधकाम परवानग्यांचा आता नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार पुनर्विचार केला जाईल, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. सरकारने दावा केल्याप्रमाणे याचिकाकर्त्यांच्या तक्रारींचे निवारण झाले आहे का, असे विचारले असता मार्टिन यांनी स्पष्ट केले की, अस्तित्वात नसलेल्या नियमांतर्गत सुरू असलेली पुढील बेकायदा बांधकामे थांबली असली, तरी आधीच झालेल्या बांधकामांमुळे जे नुकसान झाले आहे, त्यावर उपाययोजना होणे गरजेचे आहे.

मूळ मुद्यांचे निराकरण नाही!

नवी अधिसूचना जारी केल्यामुळे या याचिकेतील सर्व मुद्दे निकाली निघाले असल्याचा दावा सरकारी वकिलांनी न्यायालयात केला. मात्र, सरकारचा हा दावा याचिकाकर्त्यांनी फेटाळून लावला. ॲड. अल्वारिस यांनी सांगितले की, संबंधित झोनसाठी निश्चित केलेल्या कमाल मर्यादेचे उल्लंघन करून इमारतींना अतिरिक्त एफएआर आणि उंची देताच येऊ शकत नाही. सरकारने केवळ अतिरिक्त एफएआर कसा द्यावा याचे नियम किंवा मार्गदर्शक तत्त्वे तयार केल्याने याचिकेतील मूळ मुद्द्याचे निराकरण होत नाही.

- ज्येष्ठ ॲड. नोर्मा अल्वारिस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

32व्या वर्षीच क्रिकेटला अलविदा! भारतीय फलंदाजाकडून निवृत्तीची घोषणा, कारकिर्दीत 5,000 पेक्षा जास्त धावा अन् 12 शतकांचा विक्रम!

Construction Rules Change: गोव्यात 300 चौ. मी.च्या भूखंडांनाही वाढीव एफएआर, उंचीची मुभा; बांधकाम नियमांत मोठा बदल

Horoscope: गुरुवार कोणत्या राशींसाठी ठरणार खास? मेष राशीचे आर्थिक बजेट बिघडणार, तूळ-मकरसमोर कामाची आव्हाने; धनु-मीन राशीला मिळणार कमाईची संधी

IFFI Health Films: एड्सपासून पार्किन्सनपर्यंत! 'इफ्फी'मध्ये आरोग्यव्यवस्थेचे वास्तव उलगडणारे 3 चित्रपट

इन्शाअल्लाह, मी संपूर्ण चेकपोस्ट उडवून देईन… दहशतवादी उझैदची व्हॉट्सॲप चॅट व्हायरल; '005 ब्रिगेड' ग्रुपमध्ये रचला मोठा कट

SCROLL FOR NEXT