Goa Forward
Goa Forward Dainik gomantak
गोवा

गोवा फॉरवर्डची निवडणूक आयोगाकडे तक्रार; कृषी खात्यातही 'असाच' गोलमाल

दैनिक गोमन्तक

मडगाव : आचारसंहिता लागू झाल्यानंतरही गोवा सरकारच्या नगरनियोजन खात्यात आपल्या मर्जीतील उमेदवारांना मागच्या तारखेने नोकरभरतीची ऑफर लेटर्स दिली जात असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डने (Goa Forward) केला असून या खात्याचे आऊटवर्ड रजिस्टर निवडणूक आयोगाने (Election Commission) जप्त करावे अशी मागणी केली आहे.

गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीनुसार जुन्या तारखेने आऊटवर्ड नंबर टाकून ही ऑफर लेटर्स दिली जातात अशी आपल्याला खात्रीपूर्वक सूत्रांकडून माहिती प्राप्त झाल्याचे म्हटले आहे.

नगर नियोजन खाते उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर (Babu Kavalekar) यांच्याकडे असून आचारसंहिता लागू झाल्यानंतरही त्यांच्या खात्यातील कर्मचारी मागच्या तारखेने आऊटवर्ड क्रमांक टाकून हे काम करत असल्याचा आरोप कामत यांनी केला असून त्याचे पुरावेही आपल्याकडे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कवळेकरांच्या कृषी (Agriculture) खात्यातही असाच प्रकार चालू असल्याचा आरोप काँग्रेस (Congress) पक्षाने केला आहे. हा गोलमाल करत असताना व्हिडीओ शूट करण्यात आला असून काँग्रेस लवकरच याचा भांडाफोड करेल अशी माहिती काँग्रेसच्या काही सूत्रांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

Goa's News Wrap: ताळगाव निवडणूक निकाल, फोंड्यात खून; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT