'भाजप या देशाची लोकशाही नष्ट करण्यासाठी षडयंत्र रचतेय'

लोकशाही जेव्हा कमजोर होते, तेव्हा सर्वप्रथम अल्पसंख्यांकांना त्रास होतो
Imran Pratapgarhi
Imran PratapgarhiDainik gomantak
Published on
Updated on

भारत देशाची लोकशाही जेव्हा कमजोर होते, तेव्हा सर्वप्रथम अल्पसंख्यांकांना त्रास होतो. कारण भाजप या देशाची लोकशाही नष्ट करण्यासाठी विविध प्रकारे षडयंत्र रचित असल्याचा गंभीर आरोप अखिल भारतीय काँग्रेस समिती अल्पसंख्यांक अध्यक्ष इमरान प्रतापगरी यांनी केला. देशातील शेतकरी तर गोव्यातील युवा, महिलावर्ग भाजप सरकारवर नाराज असल्याची माहिती इमरान प्रतापगरी यांनी दिली.

मडगाव (Margao) येथे आयोजित गोवा प्रदेश काँग्रेस (Congress) अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नजीर खान यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्यातील विविध मतदारसंघातील काँग्रेस अल्पसंख्यांक कार्यकारी सदस्यांना नियुक्तीपत्रे प्रमुख पाहुणे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अल्पसंख्यांक अध्यक्ष इमरान प्रतापगरी यांच्या हस्ते भेटविण्यात आली. यावेळी त्यांच्या समवेत गोवा (goa) प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित गोव्यातील काँग्रेस अल्पसंख्यांक सदस्यांना मार्गदर्शन करताना इमरान प्रतापगरी म्हणाले की, देशात लोकशाही (Democracy) कमजोर झाली तर सर्वप्रथम अल्पसंख्यांक समाज कमजोर होतो.

Imran Pratapgarhi
आणखी तीन जागांवर गोवा फॉरवर्डचे लक्ष

देशाची लोकशाही सांभाळण्यासाठी काँग्रेस पक्ष सक्षम असून देशातून भाजपला (BJP) दूर करणे एकमेव पर्याय आहे. गोव्यातील विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) राज्यातील अल्पसंख्यांक काँग्रेस पक्षावर एकनिष्ठ राहणार अशी आशा इमरान प्रजापगरी यांनी व्यक्त केली. देशाच्या इतिहासात काँग्रेस पक्षाचा महत्त्वाचा वाटा असल्याची माहिती प्रतापगरी यांनी दिली. यावेळी नजीर खान यांनी गोवा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागातर्फे विविध मागण्यांचे निवेदन इमरान प्रतापगरी यांना सुपूर्द केले.

दरम्यान, या दोन दिवशीय गोव्यात दौऱ्यावर असलेले इमरान प्रतापगरी यांनी मडगाव येथील अनाथ मुलांच्या 'फात्मा आसरा' अनाथ आश्रमला भेट देऊन येथील मुलांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी आसरा आश्रमाचे अध्यक्ष शेख इरफान, खजिनदार फुर्कान शहा,रेहान मुजावर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, नजीर खान, मुजफ्फर शेख उपस्थित होते. नंतर इमरान प्रतापगरी यांनी फोंडा येथील साफा मज्जिद येथे भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत फोंडा मतदार संघाचे काँग्रेस उमेदवार रूपेश वेरेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

Imran Pratapgarhi
उमेदवारीची वाट न पाहता, इजिदोर फर्नांडीस यांची प्रचाराला सुरुवात

यावेळी इम्रान प्रतापगरी यांनी ओल्ड गोवा येथील पुरातन इमारतीचे पुनर्बांधणी विरोधात आंदोलन करीत असलेल्यांची भेट घेऊन त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. तसेच प्रतापगरी यांनी पवित्र ओल्ड चर्चला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत कुमारजुवेचे काँग्रेस उमेदवार राजेश फळदेसाई (Rajesh Phaldesai) उपस्थित होते. दरम्यान पणजी येथे प्रतापगरी यांनी गोव्यातील विविध अल्पसंख्यांक समाजातील सदस्यांना मार्गदर्शन केले. यावेळी गोवा प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नजीर खान व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com