Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai: मडगावकरांना पर्याय देण्यास गोवा फॉरवर्ड समर्थ

विजय सरदेसाई : आमदाराच्‍या नाकर्तेपणामुळे शहराची लागली वाट

गोमन्तक डिजिटल टीम

Vijai Sardesai मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्‍या नाकर्तेपणामुळे मडगाव शहराची पूर्णत: वाट लागली असून आता जर पर्याय शोधला नाही, तर या शहराचे भवितव्‍य अंधारात जाईल, असे जळजळीत वक्‍तव्‍य फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी करून या मतदारसंघाला आता नवीन पर्याय देण्यासाठी गोवा फाॅरवर्ड सक्षम आहे, असे सांगितले.

काही महिन्‍यापूर्वी सरदेसाई यांनी गोवा फाॅरवर्ड मडगावातूनही निवडणूक लढविणार असे सूतोवाच केले होते. त्‍यानंतर आज त्‍यांनी पुन्‍हा त्‍याचा पुनरुच्चार करून आपल्‍या पक्षाची राजकीय भूमिका स्‍पष्‍ट केली.

सोनसडो प्रकल्‍पाजवळ ५ हजार चौ. मी. जागेत वीज उपकेंद्र सुरू करण्‍यासंदर्भात जागेची पाहणी करण्यासाठी सरदेसाई आणि कुडतरीचे आमदार आलेक्‍स रेजिनाल्‍ड लॉरेन्‍स आले होते.

त्‍यावेळी पत्रकारांनी त्‍यांना या नियोजित रेस्‍टॉरंटबद्दल विचारले असता, सोनसडोच्या सर्व समस्यांना मडगावचे आमदार पूर्णपणे जबाबदार आहेत त्यांनी कॉमेक्स आणले ते अयशस्वी झाले, नंतर त्यांनी फोमेंतोला आणले काहीही सुधारले नाही. आता त्यांनीच पुढाकार घेऊन नवीन बायोमिथेनेशन प्रकल्‍प बसविण्‍याचे ठरविले आहे, असेही सरदेसाई म्हणाले.

रेस्टॉरंटची सूचना कोणी दिली?’

पार्किग प्रकल्‍पातील सध्‍या वादग्रस्‍त ठरलेल्‍या नियोजीत रेस्‍टॉरंटच्‍या प्रश्नावर दिगंबर कामत यांना त्‍यांच्‍याच नगराध्‍यक्षांनी उघडे पाडले आहे. हे रेस्‍टॉरंट येणार असे काही दिवसांपूर्वी कामत यांनी जाहीर केले होते, परंतु नगराध्‍यक्ष दामोदर शिरोडकर यांनी असा प्रस्‍तावच पालिकेने सादर केलेला नसल्याचे म्हटले आहे.

माजी नगराध्‍यक्ष लिंडन परेरा व घनश्‍‍याम शिरोडकर यांनीही यावर त्‍यांना पाठिंबा दिला आहे. त्‍यामुळे या प्रस्तावित पार्किंग प्रकल्पाच्या छतावर रेस्टॉरंट उभारण्याबाबत कोणी सूचना दिली हे कामत यांनी स्‍पष्‍ट करावे, असे विजय सरदेसाई म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA ODI Series: रोहित-विराट खेळणार, पण नेतृत्व बदलणार! वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियात होणार मोठा बदल; कोणाच्या गळ्यात पडणार कर्णधारपदाची माळ?

SIR प्रक्रियेत गोवा अव्वल! 11.85 लाख फॉर्मचे वितरण 4 दिवसांत पूर्ण; 10 दिवसांत 55 टक्के फॉर्म गोळा

Fatorda Car Fire: फातोर्डा जिल्हा कोर्टाबाहेर कारला भीषण आग! गाडी जळून खाक, जीवितहानी टळली; कारण अद्याप गुलदस्त्यात

Tenant Verification Goa: उत्तर गोवा पोलिसांची मोठी मोहीम! प्रतिबंधात्मक पोलीसिंगला धार; 66 हजारांहून अधिक भाडेकरुंची पडताळणी

Goa Politics: "मुख्यमंत्र्यांची बैठक 'फोटोसेशन'साठी", वेन्झी व्हिएगस यांची राज्यपालांकडे 'पूर्णवेळ गृहमंत्र्या'ची मागणी

SCROLL FOR NEXT