New Zuari Bridge  Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Jam: 'सेल्फी उत्सव हा सरकारच्या मूर्खपणाचा कळस...' विजय सरदेसाईंचा हल्लाबोल

Vijay Sardesai: गोवा सरकारचा निर्णय हा मूर्खपणाचा कळस अशी जळजळीत प्रतिक्रीया गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी दिली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Traffic Jam: झुआरी पुलावरील वाहतूक सुरळीतपणे व्हावी याला महत्व न देता नवीन पुलावर लोकांना सेल्फी काढण्यास प्राधान्य देण्याचा गोवा सरकारचा निर्णय हा मूर्खपणाचा कळस अशी जळजळीत प्रतिक्रीया गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी दिली आहे.

दरम्यान, झुआरी पुलावर (Zuari Bridge) झालेल्या वाहतूक कोंडीमुळे लोकांना कित्येक तास रस्त्यावर अडकून पडावे लागले. या कोंडीत रुग्ण वाहिकाही अडकल्या. लोकांचे जीवन धोक्यात आणणारा हा निर्णय मूर्खपणाचा कळस असल्याचे ट्विट सरदेसाई यांनी केले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रिय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनाही टॅग करुन हे सरकार अशा प्रकारे लोकांचे जिणे का हराम करते असा सवाल सरदेसाई यांनी केला आहे.

दुसरीकडे, कुणाच्या तरी डोक्यात आलेली ही सेल्फीची हुक्की लोकांचा जीव धोक्यात घालणारी याची सरकारला कल्पना आहे का? असा सवाल करुन कुणाच्या जीवाला धोका पोहोचला असता तर त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल घेणार का असाही सवालही सरदेसाई यांनी उपस्थित केला.

तसेच, आणखी एका ट्विटमध्ये सरदेसाई यांनी नितीन गडकरी यांनी या पूलाचे उद्घाटन 19 डिसेंबर रोजी व्हरच्युअल पद्धतीने करण्याचाही सल्ला दिला होता. विशेष म्हणजे, या सल्ल्याची आठवण करुन देताना सध्या गोव्यात जे कारभार चालवतात त्यांनी हा सल्ला धुडकावून गोव्यात (Goa) ऐन गर्दीच्या मोसमात या पुलावर सेल्फी उत्सव आयोजित करुन लोकांचा जीव धोक्यात घातला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: मुख्यमंत्री, तानावडे व सभापती दिल्लीत, चर्चांना उधाण; मंत्रिमंडळ फेरबदलाचा मात्र इन्कार

IPL Auction 2025: मास्टर ब्लास्टरच्या लेकाला मिळाला खरेदीदार! शेवटच्या क्षणी MI ने खेळला मोठा डाव

Rashi Bhavishya 26 November 2024: कुंटुबात आनंदाचे वातावरण राहील, पण बोलण्यावर ताबा ठेवा... काय सांगयतं 'या' राशीचं भविष्य?

Mumbai - Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी अपडेट, मुख्य बोगदा १५ दिवस राहणार बंद

Bhopal Goa Flight: भोपाळ ते गोवा थेट विमानसेवा! पहिल्यांदाच 180 आसनी क्षमतेचे बोईंग प्रवाशांच्या सेवेत

SCROLL FOR NEXT