Goa Forward president Vijai Sardesai criticized  Congress
Goa Forward president Vijai Sardesai criticized Congress Dainik Gomantak
गोवा

तृणमूल म्हणजे काँग्रेसने विकत बोलाविलेले श्राद्ध

दैनिक गोमन्तक

मडगाव: भाजपच्या (BJP) विरोधात सर्व समविचारी पक्ष एकत्र येऊन ‘टीम गोवा’ (Team Goa) ही संकल्पना साकार करूया, अशी सूचना मी करत होतो. पण मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने (Congress) ते काही मनावर घेतले नाही. आज जर गोव्यात तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) आली असेल तर त्यामागे हेच कारण आहे. तृणमूल हे गोव्यातील काँग्रेसने बोलावून घेतलेले विकतचे श्राद्ध आहे, अशी बोचरी टीका गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijai Sardesai) यांनी व्यक्त केली.

फ्रान्सिस लुईस गोम्स यांच्या 152 व्या पुण्यतिथीनिमित्त आज सरदेसाई यांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली. ‘टीम गोवा’ ही बलाढ्य शक्ती झाली असती आणि तिला रोखणे कुणालाही शक्य झाले नसते. त्यामुळे गोव्यात कुणी आलेच नसते.

गोव्यात आता नव्याने राजकारणात उतरलेल्या तृणमूल पक्षात चांगले नेते आहेत. त्यांच्याकडे प्रशांत किशोर यांच्यासारखा निष्णात संयोजक आहे. त्यामुळे त्यांना कमी लेखून चालणार नाही, असे त्यांनी सांगितले.

फ्रान्सिस लुईस गोम्स यांच्याबद्दल बोलताना सरदेसाई म्हणाले, ते महान गोमंतकीय असून, त्यांचा उचित सन्मान करणे अजूनही या सरकारला शक्य झालेले नाही. त्यांच्या घराचे संवर्धन करून ते स्मारक बनविण्याची गरज सरदेसाई यांनी व्यक्त केली. या घराचे संवर्धन करण्यासाठी मडगाव पालिका प्रयत्न करेल, असे नगराध्यक्ष लिंडन परेरा यांनी सांगितले. यावेळी स्वातंत्र्य सैनिक वामन प्रभुगावकर, मडगावचे नगरसेवक, 18 जून समितीचे अध्यक्ष अविनाश शिरोडकर हे उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

Lok Sabha Election 2024: ‘’शहजाद्याला PM बनवण्यासाठी पाकिस्तान उतावळा’’; व्होट जिहादवरुन मोदींनी काँग्रेसला पकडलं कोंडीत

Bicholim News : गोव्याच्या अस्तित्वासाठी झटणार : ॲड. रमाकांत खलप

SCROLL FOR NEXT