MLA Vijay Sardesai  Dainik Gomantak
गोवा

Goa LDC Recruitment Scam: ‘एलडीसी’भरतीत मोठा घोटाळा! 13 हजार उमेदवारांवर अन्याय; सरदेसाईंनी उठवलं रान

MLA Vijay Sardesai: सरदेसाई यांनी १३ हजारांपेक्षा अधिक उमेदवारांवर अन्याय झाल्याचा दावा करीत ही संपूर्ण प्रक्रिया रद्द करून पुन्हा नव्याने भरती प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी केली.

गोमन्तक डिजिटल टीम

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील कारकून पदांच्या भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात गदारोळ माजला असून याच पार्श्वभूमीवर सरदेसाई यांनी १३ हजारांपेक्षा अधिक उमेदवारांवर अन्याय झाल्याचा दावा करीत ही संपूर्ण प्रक्रिया रद्द करून पुन्हा नव्याने भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ही प्रक्रिया रद्द केली नाही, तर न्यायालयात जाऊन दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

सरदेसाई यांनी आज एक व्हिडिओ प्रसारित करून ही संपूर्ण भरतो प्रक्रिया दोषपूर्ण असून ती रद्द करावी अशी मागणी केली आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात १९२ पदे भरण्यासाठी ही प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी सुमारे १३,८०० उमेदवारांनी परीक्षा दिली होती. या नोकऱ्या देण्यासाठी उमेदवारांकडे एका महिलेने दूरध्वनीवरून पैसे मागितले अशी तक्रार घेऊन कित्येक उमेदवार आपल्याकडे आले आहेत, असे सरदेसाई यांनी सांगितले.

मुळातच ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एव्हढा दीर्घ काळ का घेतला गेला हे कळणे अनाकलनीय आहे. सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या ३० कर्मचाऱ्यांनीही परीक्षा दिली होती. मात्र, त्यांपैकी फक्त एकच युवती या प्रक्रियेत उत्तीर्ण झाली आहे. ज्यांनी १५ - १५ वर्षे जिल्हाधिकारी कार्यालयात काम केले, ते उमेदवार नापास झाले आहेत आणि ज्या युवतीला या कामाचा फक्त ४ वर्षांचाच अनुभव आहे ती युवती उत्तीर्ण झाली आहे हे कसे? असा सवाल करून ही प्रक्रिया म्हणजे संपूर्ण गौडबंगाल असल्याचा आरोप त्यांनी केला.

आपल्या मर्जीतील उमेदवारांना नोकरी मिळावी यासाठी परीक्षांचे निकालही बदलले असा आरोप करून ज्या महाविद्यालयाने ही परीक्षा घेतली, त्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर दबाव आणला गेला आणि निकालात फेरफार केल्यावर त्यांना एका वर्षांची सेवावाढ देण्यात आली, असा आरोपही सरदेसाई यांनी केला.

न्यायालयीन आयोगामार्फत चौकशी करा ः चोडणकर

काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी हा फार मोठा घोटाळा असून या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन आयोग स्थापून चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांना मुख्यमंत्र्यांनी पदावरून काढून टाकावे आणि चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मोन्सेरात यांना घेरण्यासाठी उत्पलही सरसावले

या प्रश्नावरून महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांना घेरण्यासाठी उत्पल पर्रीकर हेही पुढे सरसावले आहेत. त्यांनीही या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे. मोन्सेरात यांचे कार्यालय कोण चालवतो हे सर्वांना ठाऊक असल्याचा चिमटाही त्यांनी काढला. आपचे राज्य संयोजक अमित पालेकर यांनीही या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांकरवी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT