Goa Forward Party President Vijay Sardesai Dainik Gomantk
गोवा

काँग्रेसकडून गोवा फॉरवर्डला आणखी जागा मिळणार?

काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी दिले जागावाटपाचे संकेत

दैनिक गोमन्तक

पणजी : काँग्रेसने आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी गोवा फॉरवर्डला दोनच जागा जाहीर केल्या आहेत. मात्र त्यामुळे गोवा फॉरवर्डचे विद्यमान आमदार आणि इच्छु उमेदवार नाराज झाल्याचं चित्र होतं. आता गोवा काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी गोवा फॉरवर्डला जास्त जागा मिळू शकतील, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.

काँग्रेसने पुढील जाहीर होणाऱ्या याद्यांमध्ये गोवा फॉरवर्डला जागा वाढवून देण्याचे संकेत दिले आहेत. फॉरवर्डला जागा देण्याचा विचार सुरु आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असं दिनेश गुंडू राव यांनी सांगितलं आहे. गोवा विधानसभेच्या (Goa Assembly Election) पार्श्वभूमीवर काँग्रेसने गोवा फॉरवर्ड पक्षासोबत युती केली होती. त्याचा जागावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला होता. या जागावाटपात दक्षिण गोव्यात फातोर्डा आणि उत्तर गोव्यात मये हे दोन मतदारसंघ काँग्रेसने (Congress) गोवा फॉरवर्डसाठी सोडले आहेत.

फातोर्डा मतदारसंघात काँग्रेसने गोवा फॉरवर्डचे साठी जागा सोडल्या आहेत. गोवा फॉरवर्डचे (Goa Forward Party) अध्यक्ष आणि आमदार विजय सरदेसाई (Vijay Sardesai), तर मये मतदारसंघात संतोष कुमार सावंत हे फॉरवर्डचे उमेदवार आहेत. जागावाटपामध्ये फक्त दोन जागा मिळाल्याने शिवोलीमधील विद्यमान आमदार विनोद पालयेकर, मांद्रे मतदारसंघात दीपक कळंगुटकर आणि सांत आंद्रेमध्ये जगदीश भोबे यांची उमेदवारी धोक्यात आल्याचं चित्र होतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT