फातोर्डा Dainik Gomantak
गोवा

फातोर्डातील शेतांचे रक्षण करण्यासाठीच गोवा फॉरवर्ड

जेव्हापासुन फातोर्डा (Fatorda) मतदारसंघात (Constituency) विजय सरदेसाई (Vijai Sardesai) कार्यरत होते.

Dainik Gomantak

जेव्हापासुन फातोर्डा (Fatorda) मतदारसंघात (Constituency) विजय सरदेसाई (Vijai Sardesai,) कार्यरत होते, तेव्हापासुन काही लोक सरदेसाई येथील शेते बळकावेल अशी टिका करु लागले होते. पण 2007 पासुन आमदार विजय सरदेसाई येथील शेतांचे केवळ रक्षण करीतच नाही तर शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी झटत असल्याचे सरदेसाई यांच्या पत्नी उषा सरदेसाई (usha sardesai) यांनी शेतकऱ्यांना खत (Fertilizer) वाटपासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. या कार्यक्रमाला विजय सरदेसाईच्या अनुपस्थितीत उषा सरदेसाईहस्ते शेतकऱ्यांना खताचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी नगराध्यक्ष लिंडन परेरा, नगरसेवक राजु नाईक, गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

निवडणुका सहा महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत हे खरे असले तरी आमचा हा उपक्रम केवळ निवडणुकीपुरता नसुन गेल्या 15  वर्षांपासुन आम्ही हा उपक्रम सुरु केला असेही सौ. सरदेसाई यांनी सांगितले.गोवा फॉरवर्ड तर्फे दरवर्षी शेतकऱ्यांना नांगरणी, बी पेरणी ते कापणी पर्यंत मदत केली जाते. कापणीच्या वेळी शेतकऱ्यांना यंत्रे दिली जातात अशे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी सांगितले.यंदा फातोर्डातील 300 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना मदत केली असल्याचे कामत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Strikes Iran: अमेरिकेकडून इराणवर हवाई हल्ला; ट्रम्प यांच्या न्यूक्लियर डीलच्या दाव्यादरम्यान मिडल ईस्टमध्ये पुन्हा तणाव

Valpoi: वाळपईला कचऱ्याचा विळखा! उघडी गटारे, प्लास्टिक कचरा आणि सांडपाण्याची समस्या

Viral Video: 'आणखी खा चविष्ट समोसे, चिखल अन् पायाचा मळ एकत्र...', प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणारा व्हिडिओ व्हायरल; IRCTC नं घेतली दखल

Congress On Smart Meter: 'स्मार्ट मीटर'ची प्रक्रिया तात्काळ रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार: अमित पाटकरांचा इशारा

Bicholim Market: टोमॅटो खातोय भाव! 10 रुपयांनी दरवाढ; वालपापडी स्वस्त, राज्याबाहेरील भाज्या महागण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT