Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Goa Forward: गोवा फॉरवर्डची ‘आमचो आवाज विजय’ मोहीम! जाणून घेणार लोकांचे प्रश्‍न; पेडण्यातून होणार सुरुवात

Vijai Sardesai: आगामी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात जनतेचे प्रश्‍न जाणून घेण्यासाठी ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई हे राज्यात तालुकावार बैठका घेणार आहेत.

Sameer Panditrao

पणजी: आगामी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात जनतेचे प्रश्‍न जाणून घेण्यासाठी ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई हे राज्यात तालुकावार बैठका घेणार आहेत. त्याची सुरुवात पेडण्यातून २९ जूनपासून सुरू होणार असून ११ जुलै रोजी सांगे तालुक्यात समाप्ती होईल.

हे सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरले आहे त्यामुळे लोकांच्या समस्या विधानसभेत मांडून सकारात्मक टीकेमधून सरकारला तोडगा काढण्यास भाग पाडतील. ‘आमचो आवाज विजय’ या उपक्रमाद्वारे सर्व तालुक्यातील मतदारसंघातील नागरिकांना भेटणार असल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस (संघटन) दुर्गादास कामत यांनी दिली.

नागरिकांना त्यांचे प्रश्‍न व समस्या पाठवण्यासाठी पक्षाने ऑनलाईन सुविधाही ठेवली आहे. त्यांच्या या समस्या १० जुलैपूर्वी publicsuggestions@goaforward.in या संकेतस्थळावर पाठवाव्यात. पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांनी त्यांच्या वाढदिनी आश्‍वासन दिले होते की, ते राज्यभरातील लोकांपर्यंत वैयक्तिकरित्या पोहोचतील आणि त्यांचे प्रश्न ऐकतील.

त्यानुसार या संपर्काची रचना दोन टप्प्यात केली आहे. राज्यात वीज आणि पाण्याची कमतरता, खड्डे पडलेले रस्ते, बेरोजगारी, मोडकळीस आलेल्या शाळा किंवा मूलभूत आरोग्य सुविधांचा अभाव या सरकारच्या अपयशांमुळे जनतेच्या तक्रारींची संख्या वाढत आहे.

विजय सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली आगामी मडगाव पालिका निवडणुकीत गोवा फॉरवर्ड पक्ष सर्व २५ वॉर्डमधून निवडणूक लढवेल. पक्षाच्या गेल्या बैठकीत पक्षाच्या राज्य कार्यकारी समितीच्या सदस्यांनी आमदार सरदेसाई यांच्या निर्णयाला स्पष्टपणे मान्यता दिली आहे.
दुर्गादास कामत, गोवा फॉरवर्ड सरचिटणीस (संघटन)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'Mhaje Ghar Yojana: 'माझे घर'ला विरोध करणाऱ्यांना जवळ करू नका!- मुख्यमंत्री

Gold Price: ऐतिहासिक दरवाढ! धनत्रयोदशीपूर्वी सोन्याने केला मोठा धमाका, 10 ग्रॅम सोन्याचा भाव 130000 लाखांच्या पार

Silent Heart Attack: सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय? दुर्लक्ष करणं पडू शकत महागात; जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि धोकादायक परिणाम

EPFO PF Withdrawal: खुशखबर! PF मधून आता 100 टक्के रक्कम काढता येणार

Goa Crime: 'गॅस सिलिंडर'च्या वादातून जीवघेणा हल्ला; 3 आरोपींना पकडण्यासाठी गोवा पोलिसांचे राजस्थानात धाडसत्र

SCROLL FOR NEXT