Vijai Sardesai  Dainik Gomantak
गोवा

विजय सरदेसाई यांना यूकेचा 'पीपल्स अवॉर्ड'; ब्रिटिश संसदेत होणार पुरस्कार वितरण

Vijai Sardesai Award: सरदेसाई यांना ''इंटरनॅशनल पॉलिटिशियन'' या गटात हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव: युनायटेड किंगडमच्या संसदेतील ''हाउस ऑफ कॉमन्स''कडून दिला जाणारा प्रतिष्ठेचा ''द पीपल्स अवॉर्ड'' हा पुरस्कार फातोर्डाचे आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांना जाहीर झाला असून, ९ जुलै रोजी यूकेच्या संसदेत होणाऱ्या सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

सरदेसाई यांना ''इंटरनॅशनल पॉलिटिशियन'' या गटात हा पुरस्कार जाहीर झाला आहे. जागतिक पातळीवर लोकहितासाठी महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय नेत्यांना हा पुरस्कार दिला जातो. वास्तविक, या पुरस्कार वितरणाचा सोहळा मार्च महिन्यात झाला होता.

मात्र, त्यावेळी गोव्यात विधानसभा अधिवेशन सुरू असल्यामुळे सरदेसाई यांना त्या सोहळ्याला उपस्थित राहता आले नव्हते. त्यामुळे आता त्यांना एका विशेष सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार जागतिक पातळीवर अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT