Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Keri Goa 108 Ambulance: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी या मागणीची तातडीने दखल घेत अवघ्या तीन दिवसांत केरी परिसरासाठी १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.
Keri Goa 108 Ambulance
Keri Ambulance ServiceDainik Gomantak
Published on
Updated on

मोराजी: मांद्रे मतदारसंघातील केरी व आसपासच्या परिसरातील नागरिकांना आपत्कालीन आरोग्यसेवा तत्परतेने मिळावी, यासाठी आवश्यक असलेल्या १०८ रुग्णवाहिकेचा प्रश्न आमदार जीत आरोलकर यांनी विधानसभेच्या अधिवेशनात शून्य प्रहरात उपस्थित केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी या मागणीची तातडीने दखल घेत अवघ्या तीन दिवसांत केरी परिसरासाठी १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.

केरी आरोग्य केंद्र परिसरात नव्याने उपलब्ध झालेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आमदार जीत आरोलकर यांच्या हस्ते झाला. यावेळी केरीच्या सरपंच दर्शना नाईक, माजी उपसरपंच तातोबा तळकर, पालयेच्या सरपंच राधा परब, डॉक्टर, आरोग्य अधिकारी, पंचसदस्य आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Keri Goa 108 Ambulance
Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

यावेळी आरोलकर म्हणाले की, केरीसारख्या भागासाठी १०८ रुग्णवाहिका ही अत्यंत महत्त्वाची गरज होती. विधानसभेत विषय मांडल्यानंतर मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घातल्याने केवळ तीन दिवसांत ही सुविधा उपलब्ध झाली. अपघात, गंभीर आजार किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना वेळेत वैद्यकीय मदत मिळण्यास यामुळे मोठी मदत होणार आहे.

तुये रुग्णालयात वाढणार सुविधा

आमदार जीत आरोलकर यांनी तुये येथील बांबोळी लिंक हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरचे काम सुरू असल्याचे सांगितले. आगामी काळात या रुग्णालयात आवश्यक सुविधा वाढविण्यात येणार असून, त्याचा पेडणे आणि मांद्रे परिसरातील नागरिकांना लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Keri Goa 108 Ambulance
Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com