24 एप्रिलपर्यंत खट्टरला अटक करा! सरदेसाईंचा सरकारला अल्टिमेटम, म्हणाले, "मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसापूर्वी कारवाई न झाल्यास आंदोलन छेडणार!"

vijai sardesai warns goa govt: गोंयचो सायब सेंट फ्रांसिस झेवियर यांना अतिरेकी म्हटल्यामुळे गौतम खट्टरवर अनेक एफआयआर दाखल झाल्या आहेत.
vijai sardesai warns goa govt
vijai sardesaiDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: वादग्रस्त विधान करणाऱ्या खट्टर व त्यांना न अडवणाऱ्या गुदिन्होंवर कठोर कारवाई केली नाही तर या प्रकरणात सरकारचाही तेवढाच हात असल्याचा संदेश लोकांपर्यंत जाईल, मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसापूर्वी खट्टरला अटक व्हावी. अन्यथा आपण ‘गोंयच्या प्रजेचो आवाज चळवळ’ सुरू करू, असा इशारा आज फातोर्ड्याचे आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी दिला.

गोंयचो सायब सेंट फ्रांसिस झेवियर यांना अतिरेकी म्हटल्यामुळे गौतम खट्टरवर अनेक एफआयआर दाखल झाल्या आहेत. मुख्यमंत्री सावंत यांनी मंत्री गुदिन्होंनी त्यांना त्याच वेळी अडवायला हवे होते, असे म्हटले आहे. तरी पुढे काहीच कारवाई होताना दिसत नाही,असेही ते म्हणाले.

vijai sardesai warns goa govt
Vijai Sardesai: 'मी मुख्यमंत्री झालो तर...', विजय सरदेसाईंनी केलं मोठं वक्तव्य, निवडणुकीत कोणता मुद्दा असावा हेही सांगितलं

अशा परिस्थितीत स्वतः राज्याचे गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वतःच्या वाढदिनी पूर्वी म्हणजेच २४ एप्रिलपूर्वी गौतम खट्टर याला अटक करावी. किंवा या प्रकरणी मंत्री माविन गुदिन्हो हेही तेवढेच जबाबदार आहेत. त्यांनी आपल्या भाषणातही खट्टर यांच्या वक्तव्याचा निषेध केला नाही वरून त्यांच्या म्हणण्याला दुजोराच दिला, असे आपल्याला वाटते. त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे. वास्को येथील त्या कार्यक्रमाच्या आयोजकांवर कारवाई करावी,असे सरदेसाई म्हणाले.

vijai sardesai warns goa govt
Vijai Sardesai: 'तो विकास नसून राज्‍यातील गावांचा विनाश'! सरदेसाई कडाडले; फर्दिन रिबेलोंचे विधेयक मांडणार अधिवेशनात

खट्टरला निमंत्रित करण्यात सरकारचा हात!

गोव्यात कित्येक मुख्यमंत्री झाले. पण एकाही मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत बाहेरील लोकांनी येऊन येथील जातीय सलोखा बिघडवण्याचा कधीही धाडस केले नाही. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी श्रीराम सेनेच्या प्रमोद मुतालिक यांच्यावरही गोव्यात प्रवेश बंदी घातली. ही बंदी विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत उठवली गेली. गौतम खट्टर यांनाही गोव्यात आमंत्रित करण्यामागे सरकारचा हात असल्याचे आपल्याला वाटते,असे विजय सरदेसाई म्हणाले. गौतम खट्टर यांच्या वक्तव्याचा पक्षावर विपरीत परिणाम होईल, असे दिसताक्षणी भाजपच्या राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, ॲड. नरेंद्र सावईकर यांनी निषेध व्यक्त केला. त्यानंतर पक्षातील इतर नेते, मंत्र्यांनी निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली, असेही सरदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com