President vijai sardesai Dainik Gomantak
गोवा

Goa Election 2022: गोवा फॉरवर्डने बोलावली तातडीची बैठक

बैठकीत नेमकी काय चर्चा होणार याकडे सर्वांची उत्सुकता

दैनिक गोमन्तक

गोवा: राज्यातील राजकीय घडामोडीना चांगलाच वेग आला आहे, यातच सध्या गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी राज्यातील राजकीय घडामोडीचा आढावा घेण्यासाठी समितीची आज संध्याकाळी 4 वाजता तातडीची बैठक बोलावली आहे. (Goa Forward calls emergency meeting) Goa political Latest Update

काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड युती

येत्या विधानसभेसाठी (Goa Assembly Election) काँग्रेस (Congress) आणि गोवा फॉरवर्ड पक्षाची (GFP) युती जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसचे पक्ष नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत विजय सरदेसाई यांनी युतीची घोषणा केली होती. दरम्यान यावेळी गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आमदार विनोद पालयेकर, प्रसाद गावकर उपस्थित होते.

काँग्रेसकडून गोवा फॉरवर्ड पक्षाला दोनच जागा

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीसोबतच काँग्रेसने गोवा फॉरवर्ड (Goa Forward) पक्षाला दोन जागाही दिल्या आहेत. मात्र यामुळे गोवा फॉरवर्डच्या संभाव्य उमेदवारांची चांगलीच गोची झाल्याचं चित्र आहे.गोवा विधानसभेच्या (Goa Assembly Election) पार्श्वभूमीवर काँग्रेसने गोवा फॉरवर्ड पक्षासोबत युती केली होती. त्याचा जागावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला होता. या जागावाटपात दक्षिण गोव्यात फातोर्डा आणि उत्तर गोव्यात मये हे दोन मतदारसंघ काँग्रेसने (Congress) गोवा फॉरवर्डसाठी सोडले आहेत. गोवा काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी याबाबत घोषणा केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT