Vijay Sardesai News  Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat Elections पंचायत निवडणुका केवळ फार्स

विजय सरदेसाई : निधी अडवून पंचायती केल्या कमकुवत

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात 10ऑगस्ट रोजी 186 पंचायतींच्या निवडणुका होत आहेत. मात्र राज्य सरकारने संविधानाने दिलेले अधिकारही या पंचायतींना दिले नाहीत. त्यामुळे या निवडणुका केवळ फार्स असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांनी पंचायत व जिल्हा पंचायतींना जादा अधिकार देण्याची मागणी केली.

(Goa Forward Allegations Regarding Panchayat Elections)

सरदेसाई म्हणाले, विधानसभा अधिवेशन कामकाजाचे दिवस कमी करून विधानसभा अधिवेशन हे जसे फार्स केले, त्याच पद्धतीने पंचायतींच्या निवडणुकाही सरकारने केवळ फार्स बनवल्या आहेत. कारण पंचायत आणि जिल्हा पंचायतींना जे संविधानात्मक अधिकार मिळायला हवेत ते अधिकार दिलेच नाहीत. केंद्राकडून मिळणारा विविध योजनांचा निधीही राज्य सरकारकडून सातत्याने अडवला जातो. त्यामुळे राज्य सरकारकडून सातत्याने स्थानिक स्वराज्य संस्थांची गळचेपी केली जाते. त्यामुळे राजकारण करून निवडून येणाऱ्या पंचायत सदस्यांना अधिकारच उरलेले नाहीत.

‘भाजप उमेदवारांना मतदान करू नका’

देशभर सत्तेचे विकेंद्रीकरण व्हावे या हेतून संविधानात्मक बदल करत पंचायत आणि जिल्हा पंचायतींना विशेष अधिकार देण्यात आले. मात्र, केंद्र व राज्य सरकारमार्फत त्यांना मिळणारा विकास निधी विविध कारणे देवून अडवला जातो. हे आतापर्यंत राज्यातील विदारक सत्य आहे. त्यामुळे पंचायत निवडणुकांमध्ये भाजप पॅनलच्या उमेदवारांना जनतेने मतदान करू नये, असे आवाहनही सरदेसाई यांनी केले आहे.

‘स्वयंपूर्ण ग्रामसभा, आत्मनिर्भर पंचायत करा’

राज्य सरकारच्यावतीने अनेकवेळा खोटी आश्वासने दिली जातात. स्वयंपूर्ण गोवा आणि आत्मनिर्भर भारत यापेक्षा सध्या स्वयंपूर्ण ग्रामसभा आणि आत्मनिर्भर पंचायत महत्त्वाच्या आहे. यासाठी स्टेट फायनान्स कमिशनच्या विविध सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी नव्या समितीची नेमणूक करून अहवाल मागवावा आणि गाव - जिल्हा विकास समिती स्थापन करून विकासाला गती द्यावी, असेही सरदेसाई म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT