Meeting held by BJP Pernem on bad roads, Pernem (Goa) on Monday, 26 July, 2021 Dainik Gomantak
गोवा

Goa: राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेला माजी साबांखा मंत्री सुदिन ढवळीकर जबाबदार

मगोप कार्यकर्त्यांनी सुदिन ढवळीकरांच्या प्रतिमेचे दहन करावे. (Goa)

निवृत्ती शिरोडकर

पेडणे मतदारसंघातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे कंत्राट हे आधीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (Goa Former PWD Minister) व मागोचे ज्येष्ठ नेते (MGP Senior Leader) सुदिन ढवळीकर (Sudin Dhavlikar) यांनी दिले असल्याने रस्त्याच्या आताच्या स्थितीला ढवळीकर यांना जबाबदार धरून मगो नेते व कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेचे दहन करावे असे प्रत्युत्तर भाजपच्या पेडणे (BJP Pernem) मंडळाचे अध्यक्ष तुळशीदास गावस, उगवे, मोपा, तामोशेचे माजी सरपंच दशरथ महाले व माजी जिल्हा पंचायत सदस्य (ZP Member) तथा धारगळचे पंच प्रदीप पटेकर यांनी संयुक्त प्रसिद्धी पत्रकातून दिले आहे. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Deputy CM Babu Ajgaonkar) यांच्या बद्दल आकस बाळगणारे पण अल्प संख्येने असलेले विरोधक (Opposition Party in Goa) बावचळले असून विरोध करताना आपली सदविवेकबुद्धी घालवून बसले आहेत. पेडणेकर पवित्र मानत असलेल्या भजनाची विटंबना करण्याचा किळसवाणा प्रकार मागोचे बॅनर लावून करण्यात आला. या बद्दल पेडण्यात सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. अल्प संख्येने असलेल्या विरोधकांची ही नौटंकी निषेधार्ह आहे, असे गावस यांनी म्हटले आहे.

महामार्गाचे नवनिर्माण होत आहे. गेले पंधरा - वीस दिवस सतत पडलेल्या पावसामुळे रस्ते खराब झालेले आहेत व संततधार पावसामुळे रस्ते दुरुस्त करता आलेले नाहीत. या रस्त्याचे कंत्राट अमुक कंपनीला दिल्याबद्दल मागोचे स्थानिक नेते कार्यकर्त्यांनी आजगावकर यांना दोष देऊन त्यांच्या प्रतिमेचे दहन केले, हे चुकीचे आहे. या कंपनीला कंत्राट ढवळीकर यांनी ते सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना दिलेले असल्याने स्थानिक मगो नेते - कार्यकर्त्यांनी आपली चूक सुधारून ढवळीकर यांच्या प्रतिमेचे दहन करावे, असे मत महाले यांनी व्यक्त केले. पेडणे मतदारसंघाचा मागच्या वीस बावीस वर्षात कसा विकास झाला हे पेडणेकारांना कुणी सांगायची आवश्यकता नाही. या उपेक्षित मतदारसंघाचा आजगावकर यांनी दूरदृष्टीने व धडाडीने विकास केला. निवडणूक जवळ आल्याने आता पावसाळ्यातील बेडकाप्रमाणे डराव डराव ऐकू येऊ लागली आहे. पण, पेडण्याची जनता सुज्ञ आहे. कोणतीही कर्तबगारी नसलेल्या नौटंकीना पेडणेकार यापुढे थारा देणार नाहीत, असे पटेकर यांनी शेवटी म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: ‘घर नाही, पैसा नाही तरीही त्या दोघींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य माणुसकी शिकवणारं’

Health Tips: स्वतःकडे बरंच दुर्लक्ष होतंय, वेळ मिळत नाहीये; नेमकं करावं तरी काय?

Cash For Job Scam: अमेरिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून लाखोंना गंडा; मडगावात दोन भामट्यांविरोधात तक्रार दाखल!

Goa CM Meet Fadanvis: मुख्यमंत्री सावंतांनी गळाभेट घेऊन फडणवीसांना दिल्या विजयाच्या शुभेच्छा

IFFI Goa 2024: चित्रपट महोत्सवाला तुडुंब गर्दी; मात्र फोंड्याच्या ‘मूव्ही मॅजिकला’ अजूनही प्रेक्षक मिळेना

SCROLL FOR NEXT