Lavoo Mamledar Dies In Belgaum Dainik Gomantak
गोवा

Lavoo Mamledar Death: ..आणि रिसेप्शन काऊंटरसमोर ते कोसळले! माजी आमदार लवू मामलेदारांसोबत नेमके काय घडले? वाचा घटनाक्रम

Goa Former MLA Lavoo Mamledar Dies: लवू मामलेदार यांचे बेळगावात नेहमी येणे-जाणे होते. ते नेहमी खडे बाजार परिसरातील श्रीनिवास लॉजमध्ये उतरत.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Former MLA Lavoo Mamledar Dies In Belgaum

बेळगाव/फोंडा: कॅबला कार घासल्याचे निमित्त होऊन संतप्त कॅबचालकाने केलेल्या बेदम मारहाणीनंतर गोव्याचे माजी आमदार लवू सूर्याजी मामलेदार (वय ६८ वर्षे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी (ता. १५) दुपारी बेळगावातील खडे बाजार परिसरात ही घटना घडली.

लवू मामलेदार यांचे बेळगावात नेहमी येणे-जाणे होते. ते नेहमी खडे बाजार परिसरातील श्रीनिवास लॉजमध्ये उतरत. यावेळीही त्यांनी याच लॉजमध्ये खोल्या आरक्षित केल्या होत्या. मात्र, आज सकाळी त्यांच्याबाबत ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच त्यांची मुलगी अक्षता मामलेदार ही सायंकाळी नातेवाईकांसह बेळगावात दाखल झाली. वडिलांचे पार्थिव पाहून अक्षता हिला अश्रू आवरले नाहीत. तिने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

असा झाला मामलेदारांवर हल्ला

आजच्या घटनेविषयी श्रीनिवास लॉजचे कर्मचारी अडिवेप्पा करलिंगन्नावर म्हणाले की, लवू मामलेदार हे आमच्या लॉजचे नियमित ग्राहक होते.

मामलेदार आले, त्यांच्या पाठोपाठ कॅबचालक लगेच आला अन् त्यांना मारहाण केली. आम्ही मामलेदार यांना त्याच्या तावडीतून सोडविले.

कॅबचालकाला सांगूनही तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. अखेर त्याला अडवून आम्ही मामलेदार साहेबांना लॉजमधील रूमकडे पाठविले.

पण रिसेप्शन काऊंटरसमोरच ते कोसळले. लॉजमालकांच्या कारमधून आम्ही त्यांना रुग्णालयात आणले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

नि:स्वार्थी सेवा संस्मरणीय; मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लवू मामलेदार यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, पोलिस अधिकारी आणि नंतर आमदार म्हणून त्यांनी राज्याची केलेली निःस्वार्थ सेवा स्मरणात राहील. राज्य प्रशासन बेळगावमधील स्थानिक अधिकाऱ्यांसोबत समन्वय ठेवून या घटनेची सखोल चौकशी करत आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. त्यांच्या कुटुंबीयांप्रति माझ्या मनःपूर्वक संवेदना. दिवंगत आत्म्यास सदगती लाभो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: लिफ्ट देण्याचा बहाणा अन् निर्जन स्थळी लैंगिक अत्याचार; 15 वर्षीय मुलासोबत धक्कादायक प्रकार, आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी

Esakal No 1: 19.5 दशलक्ष युजर्सचं प्रेम! डिजिटल जगात 'सकाळ'च्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा मोहोर

Iran Protest: "काहीही झालं तरी झुकणार नाही" अयातुल्ला खामेनेईंचा ट्रम्प यांच्यावर जोरदार प्रहार; जागतिक राजकारणात खळबळ

ED Raid Kolkata: कोळसा घोटाळ्याचं 'गोवा कनेक्शन'! I-PAC वरील धाडीनं ममता बॅनर्जींचा हाय-व्होल्टेज ड्रामा; कोलकात्यात तणावाचं वातावरण

Nagnath Mahadev Temple Theft: पर्रा येथील नागनाथ महादेव मंदिरात तिसऱ्यांदा चोरी; 30 हजारांची रोकड लंपास, मूर्तीचीही विटंबना

SCROLL FOR NEXT