Goa Black Panther Dainik Gomantak
गोवा

Goa Black Panther : ...त्याच्यासाठी बाळ्ळीतील रात्र शेवटचा मुक्काम ठरली

बाळ्ळी येथे वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकला ‘ब्लॅक पँथर’; गावात पसरले होते भीतीचे वातावरण

दैनिक गोमन्तक डिजिटल

केपे तालुक्यातील बाळ्ळी येथे लोकवस्तीत फिरणारा ब्लॅक पँथर शेवटी शनिवारी (ता.1) वन विभागाने लावलेल्या सापळ्यात कैद झाला आहे. सापळ्यात आमिष म्हणून ठेवलेल्या सावजाचा फडशा पाडण्यासाठी हा पँथर अलगद त्या पिंजऱ्यात शिरला आणि अडकला. तेथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे सारे दृश्‍य कैद झाले आहे.

हा ब्लॅक पँथर नर जातीचा असून तो सुमारे दीड वर्षाचा असण्याचा अंदाज केपे येथील क्षेत्रीय वन अधिकारी प्रकाश नाईक यांनी व्यक्त केला. पहाटे चारच्या सुमारास तो या पिंजऱ्यात अडकला. या भागात हा ब्लॅक पँथर फिरत असल्याची तक्रार वनमंत्री विश्वजीत राणे यांच्यापर्यंत पोहोचल्याने त्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले होते.

गेल्या काही दिवसांपासून या भागात ब्लॅक पँथरचा वावर असल्याची चर्चा होती. त्यातून आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण होते. तथापि, वन विभागाने सर्वांना आश्वस्त केले होते. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास वन विभागाने लावलेल्या सापळ्यात ब्लॅक पँथर अडकला.

दरम्यान, ब्लॅक पँथरला पकडल्याने आसपासच्या गावातील लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. या ब्लॅक पँथरला सुरक्षित अधिवासात सोडण्यात येणार आहे. ‘ब्लॅक पँथर’ हा बिबट्या वर्गातील दुर्मिळ प्राणी आहे. या भागात असे ब्लॅक पँथर कित्येक वेळा दिसले आहेत.

त्याच्यासाठी बाळ्ळीतील शेवटची रात्र

गेल्या पंचवीस दिवसापासून वन खात्याचे कर्मचारी ब्लॅक पँथरवर डोळा ठेवून होते. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, तीन वेळा ब्लॅक पँथर पिंजऱ्यातून निसटण्यात यशस्वी ठरला होता. मात्र, शुक्रवारची रात्र या ब्लॅक पँथरसाठी बाळ्ळीतील शेवटचा मुक्काम ठरली.

स्थानिकांच्या पुढाकारानंतर कारवाई

बाळ्ळी येथे भर लोकवस्तीत रात्रीच्या वेळी ब्लॅक पँथर येऊन पाळीव प्राणी पळवीत असल्याचे अजय नाईक या स्थानिकाने लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाले होते.

5 मार्चला यासंदर्भात स्थानिकांनी पत्रकारांसमोर ब्लॅक पँथर या गावात संचार करीत असल्याचे पुरावे सादर केल्यावर यासंदर्भात बातमी प्रसिद्ध झाली होती. यानंतर वन खात्याने ‘त्या’ ब्लॅक पँथरला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Exam: आधारकार्ड तपासले आणि सापडले बोगस परीक्षार्थी! NIO परीक्षेत ‘डमी’ उमेदवार; दोघांना अटक

NFF Meeting: पाक, श्रीलंकन तुरुंगातील मच्छिमारांना सोडवा! ‘एनएफएफ’ची मागणी; 6 किनारी राज्यांशी चर्चेअंती विविध ठराव

Chorla Ghat Accident: ..चालकाने मारली उडी, ट्रक गेला दरीत! चोर्ला घाटात दाट धुके, दरड कोसळल्याने दुर्घटना; लाखोंचे नुकसान

Sunburn Dhargalim: धारगळवासीयांचा ‘सनबर्न’ला विरोध, सुनावणीला मात्र गैरहजर; न्यायालयाकडून याचिका निकाली

Goa Politics: ..हा तर लोकशाहीचा खून! विधानसभा रणनीतीच्या बैठकीच्या जागी सभापती तवडकर; विरोधकांचे टीकास्त्र

SCROLL FOR NEXT