Waterfall Canva
गोवा

Waterfalls In Goa: राज्यातील २६ धबधबे कमी धोक्याचे!

Goa Forest Department: पावसाळी पर्यटन व त्यातून स्थानिक लोकांना मिळणारा रोजगार याचा विचार करून वन खात्याने ही धबधब्यांची यादी तयार केली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पावसाळी पर्यटनासाठी निसर्ग अनुभवायला येणारे देशी विदेशी पर्यटक व त्यातून स्थानिक लोकांना मिळणारा रोजगार याचा विचार करून वन खात्याने २६ कमी धोक्याच्या धबधब्यांची यादी तयार केली आहे, अशी माहिती मुख्य वनसंरक्षक नविन कुमार यांनी गोमन्तकला दिली.

वन खात्याने नुकतेच एक सर्वेक्षण केले असून राज्यातले ८ धोकादायक धबधब्यांची यादी तयार करून ती अधिकृत करण्यासाठी मंत्रालयात पाठवली आहे.

सत्तरी तालुक्यात पाली, हिवरे, चारावणे, गुळावली, गुंगूळडे, चिदंबारम, नानेली, उकैची खाडी, कुंमठळ, माड्यांनी, खाडी गुळळे. बांधवैलो वझर, वताराची राय हे सर्व धबधबे म्हादई अभयारण्यात येतात.

भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान मोले परिसरात मैडा, कुळे, दूधसागर मंदिराजवळील महामार्ग, महामार्ग व्हीवपॉईंट, महावीर गेट महामार्ग, टळडे, बामणबुडो, पिकले वाडी, तांबडीसुर्ला, दूधसागर हे धबधबे येतात. 

नेत्रावळी वन्यजीव वनक्षेत्रात सावरी, कुस्के आणि भिती येथील धबधबे हे कमी धोकादायक श्रेणीत येतात, अशी माहिती मुख्य वनसंरक्षक कुमार यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

Goa Cashew: अस्सल गोमंतकीय काजू जगभरात पोहोचवणार! डॉ. दिव्या राणे यांचा विश्‍वास, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य

Goa Live News: देवसडा- धारबांदोडा अपघात; पळून गेलेल्या चालकाचा शोध सुरु

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

SCROLL FOR NEXT