Goa Forest Biodiversity Festival, CM Pramod Sawant statement, Goa biodiversity festival inauguration Dainik Gomantak
गोवा

"गोव्याचे पर्यावरण, वन संवर्धनासाठी गरज पडल्यास कायद्यात बदल करु"! CM सावंतांचे प्रतिपादन; ‘गोवा वन विविधता महोत्सवा’चे उद्‌घाटन

Goa Forest Biodiversity Festival: आर्ट-पार्क कांपाल येथे आयोजित पहिल्या गोवा वन विविधता महोत्सवाच्या उद्‌घाटनसमयी मुख्यमंत्री बोलत होते.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोव्यातील जल, जंगल आणि जमीन संवर्धनाची जबाबदारी जेवढी सरकारची आहे, तेवढीच ती नागरिकांची आणि येथे येणाऱ्या पर्यटकांचीदेखील आहे. गोव्याचे पर्यावरण, वन संवर्धनासाठी गरज पडल्यास कायद्यात बदलदेखील करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. आर्ट-पार्क कांपाल येथे आयोजित पहिल्या गोवा वन विविधता महोत्सवाच्या उद्‌घाटनसमयी मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, वनमंत्री विश्‍वजीत राणे, खासदार सदानंद शेट तानावडे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आमदार डॉ. दिव्या राणे, प्रधान वनसंरक्षक कमल दत्ता आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, गोव्यात मोठ्या प्रमाणात अभायरण्ये आहेत ती युवा पिढीने पाहणे, पर्यटकांना दाखविणे गरजेचे आहे. समुद्राकडून पर्यटकांना जंगलाकडे वळविण्याच्या अनुषंगाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.

या महोत्सवात सादर करण्यात आलेल्या गोव्याच्या जंगलांसंबंधीचा माहितीपट आणि आदिवासी खाद्यपदार्थांचे आसावरी कुलकर्णी यांनी केलेले दस्तऐवजीकरण हे उपक्रम स्तुत्य आहेत.

हा महोत्सव राज्यात होणाऱ्या इतर महोत्सवांच्या तुलनेत अनोखा आहे. २०२२ पासून गोव्यात पर्यटनाच्या अनुषंगाने नवनवीन संकल्पना राबविल्या जात आहेत. येथील जंगल पर्यटकांना दाखविण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. आपल्याला जर पर्यावरण सांभाळायचे असेल तर त्याची सुरवात स्वतःपासून करायला हवी, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.

महोत्सवाच्या दरम्यान ‘फॉरेस्ट रेसिपीज ऑफ गोवा-स्टोरीज ऑफ ट्रायबल फूड’ या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे छायाचित्र-निबंध स्वरूपातील पुस्तक असावरी कुलकर्णी यांनी साकारले असून, त्याचे प्रकाशन गोवा वन विकास महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

महोत्सवाचे आणखी एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे ‘फॉलिंग ऑफ द रडार-वॉटरफॉल्स ऑफ गोवा’ हा नेत्रदीपक वन्यजीव माहितीपट.

प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार व चित्रपट दिग्दर्शक गिरी कवळे यांनी या माहितीपटाचे दिग्दर्शन केले असून, स्टोरीलार्क टीमने त्याची निर्मिती केली आहे. दरम्यान, गोवा वन विविधता महोत्सवातील आदिवासी खाद्यपदार्थांच्या दालनांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यासोबतच गोमंतकीय लोककला मोरूलो, जागोर आदींना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पालकांनो, मुलांच्या हाती फोन देताय? त्याआधी ऑन करा 'या' 5 सेटिंग्ज, अश्लील कंटेंटला बसेल कायमचा लगाम

VIDEO: 'मला वाटलं होतं खूप घाण असेल, पण...' भारतीय रेल्वेच्या प्रवासाने विदेशी तरुणी भारावली; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

IPL 2025: RCB फॅन्ससाठी मोठी बातमी! चिन्नास्वामी स्टेडियमवर सामने होणार की नाही? कर्नाटक सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

Goan Solkadhi: गोंयकाराची पहाटेची स्वप्नं दाट गुलाबी असतात, कारण त्यात 'सोलकढी'तल्या सोलाचा गडद रंग आणि नारळाच्या रसातला दाटपणा असतो..

तेंव्हा इकडे स्वतंत्र भारत, तर तिकडे गोवा होता! याबाजूला भारतीय जवान तर तिकडे पाकल्यांचे ‘सोजीर’ बंदुका घेऊन ताठ उभे होते..

SCROLL FOR NEXT