Goa Football Association, Housie Ban Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Housie Ban: फुटबॉल स्पर्धेवेळी ‘हाऊजी’ला बंदी नको! GFA ची सरकारला विनंती; दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

Goa Football Association: ‘हाऊजी’वर बंदीमुळे अनेक फुटबॉल स्पर्धांच्या आयोजनाबद्दल साशंकता निर्माण झाली असल्याचे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.

Sameer Panditrao

सासष्टी: गोवा फुटबॉल असोसिएशनने गुरुवारी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एगना क्लेटस (आयएएस) यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले व फुटबॉल स्पर्धेदरम्यान ‘हाऊजी’वरील बंदी पासून सूट देण्याची विनंती केली. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व अध्यक्ष कायतान फर्नांडिस यांनी केले.

गावात होणाऱ्या फुटबॉल स्पर्धा ‘हाऊजी’ आयोजित करून जो महसूल मिळतो त्यावर चालतात. त्यांना इतर दुसरीकडून आर्थिक मदत मिळत नसते. ‘हाऊजी’वर बंदीमुळे अनेक फुटबॉल स्पर्धांच्या आयोजनाबद्दल साशंकता निर्माण झाली असल्याचे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.

फुटबॉल स्पर्धेदरम्यान आयोजित ‘हाऊजी’मध्ये एक लाख रुपयांपेक्षा जास्त बक्षिसांची रक्कम नसेल असे जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. फुटबॉल स्पर्धेदरम्यान ‘हाऊजी’चे आयोजन हे समुदाय आधारित निधी उभारणीचा भाग असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

बंदीच्या निर्णयात बदल अशक्य

सध्या तरी ‘हाऊजी’ बंदीच्या निर्णयात कोणताही बदल होणार नाही, याबद्दल जिल्हाधिकारी ठाम असल्याचे दिसून आले आहे. जोपर्यंत फुटबॉल स्पर्धेदरम्यान हाऊजी आयोजनासाठी पद्धतशीर नियम व अटी आखल्या जात नाहीत, तोपर्यंत गोवा फुटबॉल असोसिएशनने यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

SCROLL FOR NEXT