Goa Football Association  Dainik Gomantak
गोवा

Goa Football Association: गोवा फुटबॉल असोसिएशनने मागितले ५ कोटी रुपयांचे सरकारी अनुदान

Fatorda Stadium Goa: फुटबॉलच्या खेळाला प्रोत्साहन मिळावं म्हणून अनुदानाची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Madgao, Goa

मडगाव: राज्यात फुटबॉलच्या खेळाला प्रोत्साहन मिळावं म्हणून गोवा फुटबॉल असोसिएशनने राज्य सरकारकडे ५ कोटींच्या अनुदानाची मागणी केली आहे.

गेल्या आठवड्यात गोवा फुटबॉल असोसिएशनकडून पहिल्यांदा भाऊसाहेब बांदोडकर स्मृती करंडकाची आंतराष्ट्रीय स्थरावर आखणी करण्यात आली होती.

गोवा आणि ओडिशा यांच्यामध्ये अंतिम सामना रंगला आणि हा सामना पाहण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, क्रीडा मंत्री गोविंद गावडे उपस्थित होते.

मुख्यमंत्रीच्या उपस्थितीत झालेल्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात गोवा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष कायथनो फर्नांडिस यांनी सरकारच्या मदतीशिवाय हा सामना होऊ शकला नसता असे वक्तव्य केले.

येणाऱ्या काळात जर का गोव्यातील फुटबॉल क्षेत्रातील काम वाढवायचे असेल तर आणखीन आर्थिक मदत आवश्यक आहे असेही ते म्हणाले .

भाषणात पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांच्याजवळ गोवा फुटबॉल असोसिएशनला दरवर्षी ५ कोटी रुपयांची मदत पोहोचवावी अशी मागणी केली आहे.

राज्य सरकारच्या आर्थिक मदतीशिवाय राज्यात फुटबॉल क्षेत्रात पायाभूत सुविधांचा विकास, स्पर्धा किंवा फुटबॉल क्लब्सना आर्थिक मदत पोहोचवता येणार नाही मात्र जर का ही मदत मिळाली तर येणाऱ्या काळात गोवा फुटबॉल असोसिएशन नक्कीच बदल घडवून आणेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Art Exhibition: 'स्टिल/गोवा'मधून दिसणार गोव्याची अनोखी कहाणी; 1994 ते 2004 चा काळ छायाचित्रांतून जिवंत

Surya Gochar 2026: प्रेमसंबंधात गोडवा अन् करिअरसह व्यवसायात भरभराट! सूर्याचं धमाकेदार गोचर; 5 राशींचं उजळणार नशीब

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

SCROLL FOR NEXT