FDA Raid Dainik Gomantak
गोवा

FDA Raid: अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई; निकृष्ट काजू आणि बेकायदेशीर सिगारेट जप्त!

Goa FDA Raid: गोव्यात गेल्या काही दिवसांपासून अन्न आणि औषध प्रशानसनाकडून धडक मोहीम राबवण्यात येत आहे. यातच आता, प्रशासनाने एक मोठी कारवाई केली आहे.

Manish Jadhav

गोव्यात गेल्या काही दिवसांपासून अन्न आणि औषध प्रशानसनाकडून धडक मोहीम राबवण्यात येत आहे. यातच आता, प्रशासनाने एक मोठी कारवाई केली आहे. उत्तर गोव्यातील समुद्रकिनारी असलेल्या काजूच्या तीन दुकानावर ही कारवाई करण्यात आली. FSSAI परवान्याशिवाय ही दुकाने सुरु होती. प्रशासनाने कारवाई करत तात्काळ दुकाने बंद करण्याचे आदेश मालकांना दिले आहेत. हद्द म्हणजे, या तीनही दुकानात निकृष्ट दर्जाचे काजू मिसळून विकले जात होते. कळंगुट येथे ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याचे प्रशासनाला आढळून आले. 1 लाख किमतीचा साठाही नष्ट करण्यात आला आहे. याशिवाय, कळंगुट सर्कलजवळील एका दुकानातून ई-सिगारेट आणि विदेशी सिगारेट जप्त करण्यात आली.

म्हापसा बसस्थानकावर कारवाई!

काही दिवसांपूर्वीच, म्हापसा बसस्थानकावरुन मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. प्रशासनाने म्हापसा बस स्थानकावरुन तब्बल दीड लाखांचे 500 किलो पनीर जप्त केले होते. मुंबईतून गोव्यात येणारे फ्रोजन फूड, मावा, मसाले यासारखे खाद्यपदार्थ या छापेमारीत जप्त केले होते. रिचर्ड नोरोन्हा यांच्या नेतृत्वाखालील FDA अधिकाऱ्यांनी खाजगी वाहनांची अचानक तपासणी करुन दीड लाखांचे पनीर जप्त केले होते. महाराष्ट्र आणि कर्नाटक येथून येणाऱ्या खाजगी वाहनावर ही कारवाई करण्यात आली होती.

तसेच, म्हापसा, हणजुणे, कोलवाळ येथे बेकायदेशीररित्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांवर म्हापसा पोलिसांनी कारवाई केली होती. दुकानमालक आणि विक्रेत्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT