Illegal Food Stall | Goa FDA Department Dainik Gomantak
गोवा

Illegal Food Stall: गोव्यातील कोरगावात 'मंच्युरियन' स्टॉलवर FDAची धडक कारवाई

Illegal Food Stall: बेकायदेशीर गोबी मंच्युरियन स्टॉलवर कारवाई करुन बंद करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

Illegal Food Stall: अन्न व औषध खात्याने काल कोरगाव येथील भूमिका देवीच्या जत्रोत्सवाला आलेल्या नऊ बेकायदेशीर गोबी मंच्युरियन स्टॉलवर कारवाई करून बंद पाडले. सदर स्टॉल धारकाशी अन्न व औषध खात्याच्या अधिकाऱ्यांनी खात्याचा परवान्याची तसेच ग्रामपंचायतीच्या परवानगीची मागणी केली, असता या नऊ स्टॉल धारकांपैकी कोणाकडे कसलाही परवाना नसल्याचे समोर झाले आहे.

अन्न व औषध खात्याच्या योगिता सिरसाट, डारलेण्ड दिवकर, अर्जुन, प्रितम परब यांनी ही कारवाई केली. अशा या गोबी मंचुरीयन स्टॉलवर सॉस व इतर साहित्य कमी दर्जाचे होते. परवानगी असलेले खाद्य रंग वापरा, ते देखील फक्त परवानगी असलेल्या खाद्यपदार्थांमध्ये आणि परवानगी असलेल्या प्रमाणात वापरण्यास परवानगी आहे.

दरम्यान, या स्टॉलवर पण परवाना नसलेला, कमी दर्जाचा खाद्य रंग, तसेच परवानगी नसलेल्या पदार्थास कुठलाही खाद्य रंग वापरणे, गोबी मंच्युरित वापरण्यात येणारा ‘हाजी मोटो’ अशा सर्व गोष्टी आरोग्यास अपायकारक आहेत, अशी सर्वत्र चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर गोबी मंच्युरियन विक्रेता स्टॉलवर कारवाईची धडक मोहिम सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: अर्शदीप सिंगच्या रन-अपची विराटनं उडवली खिल्ली! रोहितलाही हसू आवरले नाही; सराव सत्रातील व्हिडीओ व्हायरल

Gauri Achari Murder Case: गौरी आचारी खून प्रकरण! गौरव बिद्रेचा चौथ्यांदा जामीन अर्ज फेटाळला, विलंब होतो म्हणून जामीन मिळणार नाही

Goa Politics: खरी कुजबुज; भाजप खासदार काँग्रेस नेते?

'पॉश'च्या अंमलबजावणीत गोवा मागे! न्यायालयाकडून तीव्र नाराजी; अनेक कार्यालयांत अद्याप तक्रार समित्याच नाहीत

मच्छिमारांच्या होड्या मच्छीमार खाते घेणार भाड्याने, किनारी गस्त मजबूत करण्यासाठी सरकारचे प्रयत्न; इच्छुकांकडून मागवल्या निविदा

SCROLL FOR NEXT