Revolutionary Hero Dada Rane's House is in truble due to flood at Village Adavi, Goa B. D. Mote / Dainik Gomantak
गोवा

Goa: अडवईतील क्रांतीवीर दादा राणेंचे घराला पुराच्या पाण्याचा तडाखा

पुरातन वारसा संवर्धनाची वारसदारांनी केली मागणी (Goa)

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले: गेल्या दोन दिवसांपूर्वी राज्यात पावसाचा कहर (Havoc of Rain) होऊन बऱ्याच ठिकाणी घराची पडझड झाली, तर शेती बागायतीचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्याच प्रमाणे भिरोंडा पंचायत क्षेत्रात असलेल्या अडवई येथील ' पोर्तुगीजांच्या विरूद्ध बंडाचे निशाण फडकावून त्यांना सळो की पळो करून सोडलेल्या ' क्रांतीवीर दादा राणें ' (Revolutionary Dada Rane) यांच्या घराला फटका बसला असून, घरात सुमारे दोन मीटर पाणी भरल्याने पुर्वीच्या काळात बांधलेल्या मातीच्या घराच्या भिंतींना तडे गेल्याने एक 'वारसा स्थळ' (Heritaje site) म्हणून जोपासना करून ठेवलेल्या वास्तूच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे, या प्रकरणी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (CM Dr. Pramod Sawant) आणि आरोग्य मंत्री विश्वजीत राणे (Health minister Vishwajit Rane) यांनी दखल घेऊन या वास्तुची जोपासना करण्यासाठी उपाय योजना आखावी अशी मागणी त्यांचे वंशज उदयसिंह राणे यांनी केली आहे.

या संबंधी माहिती देताना उदयसिंह राणे यांनी सांगितले की, या घरामध्ये स्वातंत्र्य चळवळीतील सेनानी क्रांतीवीर दादा राणेंचे वास्तव्य होते, क्रांतिवीर दादा राणे यांनी पोर्तुगीजांविरूद्ध बंडाचे निशान उभे करून ' राज्य मुक्ती'साठी लढा दिला होता, सद्यस्थितीत या घरात दोन कुटुंबे राहत होती, परंतू कधीही कल्पना करता येणार नाही, अशा प्रकारे पुराचे पाणी त्यांच्या घरात शिरले, पावसाने धारण केलेल्या रुद्रावतारामुळे फार मोठा इतिहास असलेल्या या घरात पाणी शिरून पुर्वीच्या काळापासून योग्य निगा राखून सुरक्षित ठेवलेल्या या मातीच्या घराच्या भिंतींना तडे जाऊन सदर घरा असुरक्षित बनले आहे. या घरात अचानक पुराचे पाणी शिरल्यामुळे सर्व सामान खराब झाले आहे. साधारणतः दोन मीटर पातळीचे पाणी शिरून साचल्यामुळे सदर घराच्या सुरक्षेला बाधा निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सायंकाळी गोव्याचा एक मूड असतो! त्यांना जास्त वेळ थांबवणं योग्य नाही; भाषण उरकत घेत अमित शहांची मिश्किल टिप्पणी

Amit Shah In Goa: "2047 पर्यंत वाट पाहायची गरज नाही, 2037 पर्यंत गोवा 'विकसित राज्य' बनेल", गृहमंत्री अमित शहांचा विश्वास

Rohit Sharma Captaincy: 'राजकीय' खेळात 'हिटमॅन' रोहितची विकेट! टीम इंडियावर गंभीर आरोप, चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

अमित शहांच्या हस्ते 'म्हजे घर योजने'चा भव्य शुभारंभ! CM सावंतांनी दिली '6 महिन्यांत नोंदणी'ची ग्वाही

ओपा प्रकल्पातील दुरुस्ती पूर्णत्वाकडे; पणजीला 11 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरु होण्याची शक्यता!

SCROLL FOR NEXT