At Davankon-Dharbandora water stuck in village. (Goa) Dainik Gomantak
गोवा

Goa: धारबांदोड्यातील लोकांना पुराची धडकी

अनेक गावांत घुसले पाणी, साकोर्ड्यात पुलाचे मोठे नुकसान (Goa)

Sandeep Survekamble

धारबांदोडा ः (Dharbandora) सतत दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे (rainy Season) धारबांदोडा तालुक्याला पुराचा (Flood) मोठा फटका बसला आहे. या पुरात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून, गुरुवारी पहाटे झोपेत असताना अचानक अनेक घरांत पाणी शिरल्याने लोकांची तारांबळ उडाली. गेल्या पन्नास वर्षात अशा प्रकारचा पूर अनुभवलेला नाही, असे लोकांनी सांगितले. रात्री अचानक नद्यांच्या पाण्याची पातळी (Water Level) वाढल्याने तालुक्यातील लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पुराचा सर्वाधिक फटका कुळे-शिगाव पंचायत, साकोर्डा पंचायत, धारबांदोडा पंचायतीतील दावणोक या गावांना बसला आहे. कुळे पंचायत क्षेत्रातील भरीपवाडा व साकोर्डा पंचायत क्षेत्रातील मधलावाडा-साकोर्डा येथील पुलाचे कठडे (Sacorda Bridge) व बाजूच्या संरक्षक भिंती कोसळल्याने संपर्क तुटला आहे. दावकोण येथील ग्रामस्थांना या पुरामुळे संरक्षिक ठिकाणी म्हणजे बालशाळेत ठेवण्यात आले आहे. (Goa)

मधलावाडा-साकोर्डा यथील पुलाचे कठडे व रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे येथील संतप्त झालेल्या नागरिकांनी हा पूल दुरुस्त न करता जोपर्यंत नव्याने बांधला जात नाही, तोपर्यंत रस्ता खुला करू देणार नसल्याचा इशारा दिला आहे. याच पंचायत क्षेत्रातील उदळशे येथील घरात पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कुळे-बिंबल येथील तीन घरांमध्ये पाणी घुसून मोठे नुकसान झाले आहे. बाजारवाडा-कुळे येथे सात घरांमध्ये पाणी घुसून नुकसान जाले आहे. दूधसागरच्या पाण्याच्या प्रवाह इतका मोठा होता की, कुळे रेल्वे स्टेशनच्या मायडवाडा येथील फाटकापर्यंत पाणी शिरले होते. कुळे पंचायत क्षेत्रातील मेटावाडा व बिंबल येथील गणेश विसर्जन शेडही पाण्याच्या प्रवाहात जमीनदोस्त झालेली आहे.

बुधवारी रात्रीपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस गुरुवारी रात्रभर सुरूच होता. अचानक मोठा पूर येईल अथवा पाण्याची पातळी वाढेल अशी कल्पना कुणालाच नव्हती. काही लोक झोपेत असताना घरात घुसलेल्या पाण्याचा स्पर्श पायाला लागल्यानंतर लोकांना जाग आली आणि अशा कुटुंबियांची धांदल उडाली. कुळे मेटावाडायेथे असलेल्या पुलावरून यंदा पहिल्यांदाच पाणी गेले आहे. वेळीपवाडा शिगाव येथे महादेव मंदिरापर्यंतच्या वाड्यावर पाणी शिरले आहे. त्यामुळे येथील लोकांत घबराट पसरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

SCROLL FOR NEXT