भटवाडी अडवई येथिल सावईकर जमीनदोस्त झालेली सात घरे Dainik Gomantak
गोवा

Goa Flood: भिरोंड्यातील नागरिकांचा मदतीसाठी आक्रोश

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले: म्हादई नदीच्या काठावर असलेल्या भिरोंडा पंचायत क्षेत्रातील अडवई, पाडेली, म्हादई, सावर्शे व वाते या भागातील सुमारे 49 घरे काल पुराच्या पाण्याने जमीनदोस्त झाली असून, त्यामुळे या घरात राहणाऱ्या कुटुंबांचे संसार उद्धवस्त झाले आहेत, सद्या त्याना शेजारी, नातेवाईक, गुरांचे गोठे या ठिकाणी आसरा घेण्याची पाळी आली आहे, त्यात कपडे, भांडी कुंडी व इतर साहित्य मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याने भरपावसाळ्यात थंडी व वाऱ्याचा सामना करून दिवस काढावे लागले आहेत. या संबंधी सरकारच्या आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातून त्यांचे संसार व इतर साहित्य घेण्यासाठी तात्काळ मदत देण्याची अत्यंत गरज आहे, आज दिवसभर सत्तरी आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणे तर्फे सर्वेक्षण काम करण्याचे काम सुरू होते.

रहायला घर नसल्याने गोठ्यात आसरा घेतलेले सावईकर कुटुंबातील महिला व जेष्ठ नागरिक

भिरोंडा पंचायत क्षेत्रातून जाणाऱ्या म्हादई नदीच्या काठी वसलेल्या वरील भागात ओहळातील पाण्याची पातळी वाढल्याने, पहाटेच्या सुमारास या घरात पाणी शिरले, या प्रमाणे प्रथमच या भागात पाणी आले असे काही जाणकार नागरिकांनी सांगितले, या मध्ये सर्वात जास्त फटका एकाच जागेवर परंतू वेगवेगळ्या घरात राहणाऱ्या सावईकर कुटुंबाला बसला आहे, त्यांची घरे, सोन्याचे दागिने, एक चारचाकी वाहन, एक, मोटरसायकल, घरातील भांडी, कपडे, घरातील किंमती लाकडी साहित्य, विजेवर चालणारी उपकरणे, बागायती मधील उत्पन्न, असे मिळून कोट्यवधी नुकसान झाले असल्याचे माहिती सावईकर कुटुंबांनी दिली आहे. त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे काही कागदपत्रे, शालेय प्रमाणपत्रे ही मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत अशी माहिती श्रीकांत सावईकर यांनी दिली.

या ठिकाणी असलेले घर हे वडिलोपार्जित होते, त्यात एकुण सात कुटुंबे राहत होती, मुळ बागायती उत्पादनावर अवलंबून असलेल्या आमच्या कुटुंबांवर मोठे संकट कोसळले आहे, या मध्ये इतर वस्तूची हानी होताना गोवा बागायतदार मध्ये विक्री साठी तयार करून ठेवलेली सुमारे 25 क्विंटल सुपारी, तसेच शेकडो नारळ माती खाली गाडले आहेत, सद्या ही कुटुंबे नातेवाईक, शेजारी, तसेच गायीच्या गोठ्यात कोणतेही साधन सुविधा नसताना दिवस काढीत आहे, याची दखल सरकारने घेऊन जास्तीत मदत सावईकर कुटुंबाला द्यावी अशी प्रतिक्रिया अपुर्वा सावईकर सहाकारी हीने व्यक्त केले आहे.

या भागात निसर्गाने केलेल्या उद्धवस्ताची दखल घेऊन सत्तरी आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातून सर्वेक्षणाचे काम हाती घेतले असून, त्यानुसार आज दिवसभरात पाडेली, सावर्शे, म्हादई, अडवई भटवाडी,,, वांते या ठिकाणची मिळून 49 घराचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे, यामध्ये पाडेली, म्हादई व अडवई भटवाडी मिळुन 26 घरे तर सावर्शे व वांते 22 घरे असल्याची माहिती यावेळी सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी दिली. सत्तरी मामलेदार दशरथ गावस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या सर्वेक्षण गटात सरकारी बांधकाम खात्याच्या बिल्डिंग विभागाचे कनिष्ठ अभियंता संतोष लाड, सुनील म्हाऊसकर, तालठी रवींद्र गावस, राजेश बेनके, यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी वर्गाचा समावेश होता.

या पावसाचा सर्वाधिक फटका सत्तरी तालुक्याला बसला असल्याची दखल घेऊन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्या आदेशानुसार आज दुपारी राज्याचे मुख्य सचिव परिमल राय, तसेच उत्तर गोवा जिल्हाधिकारी अजित राय, उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर, सत्तरी मामलेदार दशरथ गावस यांनी अडवई भटवाडी येथिल सावईकर कुटुंबाच्या पडलेल्या घराची पाहणी करून सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी सत्तरी तालुक्यातील झालेल्या नुकसानीचा सविस्तर अहवाल सोमवारपर्यंत आपल्या कार्यालयात पाठवून देण्याचा आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकारी अजित राय यांनी सत्तरी मामलेदाराना दिला आहे.

नुकसानीची सर्वेक्षण करताना सत्तरी आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेचे अधिकारी

या पावसाच्या पुरामुळे अडवई येथिल पोर्तुगीजांच्या विरूद्ध बंड केलेले स्वातंत्र्य सेनानी दादा राणे यांच्या वडिलोपार्जित घराला तडाखा बसला असून, त्यात त्या घरात सद्या दोन कुटुंबे राहत आहेत, त्यांचे सर्व किंमती साहित्य खराब झाले आहे, त्याचं प्रमाणे सदर घरात सुमारे दोन मीटर पाणी भरल्याने घराच्या भिंतींना तडे गेले आहेत, त्यामुळे या इतिहास कालीन तसेच पुरातन वास्तूंच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होऊन, त्या घराच्या संवर्धनाचा विषय ऐरणीवर आला आहे. या संबंधी आरोग्य मंत्री विश्वजीत राणे तसेच राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी या इतिहास कालीन घराचे संवर्धन करण्यासाठी उपाय योजना आखावी अशी मागणी या वेळी दादा राणेंचे वंशज उदयसिंह राणे यांनी केली आहे.

या ठिकाणी आलेल्या पुर हा बऱ्याच वर्षांपासून आला असून, या संबंधी सरकारच्या आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेच्या वतीने कोणतीच सुचना दिली नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली, अगाऊ सुचना मिळाली असती तर निदान काही सामान वाचवण्यास यश आले असते असे श्रीकांत सावईकर यांनी सांगितले.

भटवाडी अडवई येथिल सावईकर जमीनदोस्त झालेली सात घरे

या नैसर्गिक संकटा संबंधी सरकाराची आपत्कालीन यंत्रणा पुर्ण पणे अपयशी ठरली आहे, या संबंधी सरकारी पातळीवर होणाऱ्या बैठका मधून वेळोवेळी आवाज उठवून सुद्धा जोरदार पाऊस सुरू असताना तालुक्याच्या ठिकाणी सदर व्यवस्था स्थापन केली नाही, निदान यापुढील संकटांना सामना करण्यासाठी आता तरी तालुका पातळीवर कायम स्वरुपी आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा उभी करावी अशी मागणी भिंरोड्याचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच उदयसिंह राणे यांनी केली आहे.

दरम्यान, या पंचायत क्षेत्रात पावसाच्या तडाख्याने पडलेली घरे, त्याच प्रमाणे पावसाच्या पाण्याने असुरक्षित बनून राहिलेली घरे, त्यामुळे झालेल्या भांडी कुंडी, कपडे, विजेवर चालणारी उपकरणे, मौल्यवान वस्तू, गाड्या, तसेच इतर साहित्याचा अंदाज केला असता भिरोंडा पंचायत क्षेत्रातील नुकसानीचा आकडा करोडो रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT