२३ जुलैला आलेल्या म्हादई नदीच्या पुरातून सत्तरीतील २०० पेक्षा जास्त घरांना पुराचा फटका बसला Dainik Gomantak
गोवा

Goa: सत्तरीतील पूरग्रस्त कुटुंबे मदतीच्या प्रतीक्षेत

केवळ ३८ पूरग्रस्तांना (Flood victims) मदत, चतुर्थीपूर्वी मदत मिळण्याची अपेक्षा, सरकारने ते मातीचे ठरवले आणि हा भेदभाव केला. सरकारच्या या अशा भेदभाव करणाऱ्या धोरणाचा फटका या आदिवासी कुटुंबाला बसला आहे.

दैनिक गोमन्तक

पर्ये: म्हादईच्या (Mhadai) पुराला ४० दिवस उलटून देखील सत्तरीतील (sattary) सर्व पूरग्रस्तांना नुकसान भरपाई (Compensation to flood victims) न मिळाल्यामुळे ग्रामस्थांत नाराजी व्यक्त होत आहे. चतुर्थी ऐन तोंडावर आल्याने चतुर्थीपूर्वी तरी ही मदत (Help) मिळेल का याचना नुकसानग्रस्त कुटुंबे करीत आहेत. २३ जुलैला आलेल्या म्हादई नदीच्या पुरातून सत्तरीतील २०० पेक्षा जास्त घरांना पुराचा फटका बसला होता. त्यात बरीच घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली होती तर काही अर्धवट मोडणे व इतर नुकसान झाली होती. चतुर्थीपूर्वी ही मदत मिळेल, या अपेक्षेत पूरग्रस्त आहेत.

सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी सत्तरीतील फक्त ३८ कुटुंबांना आर्थिक मदत दिली, पण उर्वरित कुटुंबांना यांची मदत दिली नाही. मदत मिळालेल्यापैकी ७ कुटुंबांना २ लाख रुपये तर ३१ जणांना १ रुपयांची लाखांची मदत देण्यात आली आहे.

सत्तरीचे मामलेदार दशरथ गावस म्हणाले, उर्वरित सुमारे १०० पूरग्रस्तांना मदत चतुर्थी पूर्वी देण्यात येईल.१०० पूरग्रस्त कुटुंबाची प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांची नावे उद्यापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवली जातील. त्यानंतर त्यांना चतुर्थीपूर्वी ही मदत देण्यात येईल. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

वांतेच्या बोणकेवाडा या दुर्गम भागातील उत्तम गावडे व पांडुरंग गावडे या भावांवर सरकारने अन्याय केल्याचे स्पष्टपणे दिसून आले. म्हादईच्या पुराने या दोन भावांच्या कुटुंबाचे एकच असलेले घर पूर्णपणे जमीनदोस्त झाले होते. सरकारने पूर्णपणे जमीन दोस्त झालेल्या घरांना २ लाखांची मदत करण्याचे जाहीर केले असताना या दोन्ही कुटुंबाला मिळून फक्त एक लाख देण्यात आले.

सरकारने मातीच्या घराला कच्चे घर अशी विभागणी केलेली आहे. दगडी- चिऱ्यांचे घर हे पक्के घर त्यांना रुपये २ लाख, मातीचे घर हे कच्चे त्याला १ लाख मदत केली आहे. उत्तम व पांडुरंग गावडे यांचे घर पूर्णपणे मातीचे होते. त्यामुळे सरकारने ते मातीचे ठरवले आणि हा भेदभाव केला. सरकारच्या या अशा भेदभाव करणाऱ्या धोरणाचा फटका या आदिवासी कुटुंबाला बसला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT