Goa - Lucknow Flight Dainik Gomanta
गोवा

Goa Flight: गोव्यात घडली असती अहमदाबाद सारखी घटना; उड्डाण घेताच विमान आले खाली, 172 प्रवाशांनी जीव मुठीत घेऊन केला प्रवास Video

Goa - Lucknow Flight: विमान कोसळणार की या भीतीने विमानातील प्रवाशांनी जीवाच्या आकांताने आक्रोश केला. दरम्यान, वैमानिकाने प्रसंगावधान दाखवत विमान नियंत्रित करत सुरक्षितपणे लँड केले.

Pramod Yadav

Goa - Lucknow Flight Horrifying Experience

पणजी: अहमदाबाद येथे एअर इंडिया विमानाच्या झालेल्या अपघातात २६५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातातून देश सावरत असताना गोव्यातून काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना समोर आली आहे. गोवा विमानतळावरुन उड्डाण घेताच इंडिगोच्या विमानाचा तोल जाऊन, विमान खाली येऊ लागले, पायलटने प्रसंगावधान दाखवत विमान नियंत्रित केले. पण, लखनऊपर्यंतचा पूर्ण प्रवासात १७२ प्रवाशांनी जीव मुठीत घेऊन प्रवास केला.

"गोव्यातून इंडिगो कंपनीचे ६ई - ६८११ विमानाने दुपारी ३.४८ वाजता लखनऊसाठी उड्डाण घेतले. उड्डाण घेल्यानंतर विमानाचा तोल जाऊन विमान जमीनीच्या दिशेने येऊ लागले. विमान कोसळणार की या भीतीने विमानातील प्रवाशांनी जीवाच्या आकांताने आक्रोश केला. दरम्यान, वैमानिकाने प्रसंगावधान दाखवत विमान नियंत्रित करत सुरक्षितपणे लखनऊच्या अमौसी विमानतळावर सुरक्षितपणे उतरले," असा थरारक अनुभव या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवासी जॉली खान यांनी सांगितला आहे.

"अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेमुळे भीतीच्या छायेत असणारे प्रवासी गोव्यात घडलेल्या या प्रकारामुळे भलतेच घाबरले. विमानातून १७२ प्रवासी प्रवास करत होते. लखनऊ पर्यंतचा जवळपास अडीच तासांचा प्रवास प्रवाशांनी जीव मुठीत घेऊन केला. लखनऊ विमानतळावर दाखल झाल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला, पण सर्व प्रवाशांवर भीती स्पष्ट दिसत होती," असे खान यांनी म्हटले आहे.

दरम्यान, "विमानात तांत्रिक बिघाड असल्यामुळे असं झालं का? आणखी काय? याचा तपास व्हायला हवा असा सवाल देखील खान यांनी उपस्थित केला आहे. या घटनेबाबत प्रवाशांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही. हवामानामुळे असं घडलं का याबाबत सूचना करण्यात आली नाही, विमानाचा पायलट, आणि प्रथम अधिकारी यांची चौकशी व्हायला हवी," असेही खान म्हणाल्या.

अहमदाबाद येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर विमानांची सुरक्षा आणि देखभाल याबाबत सवाल उपस्थित केले जात आहेत. त्यानंतर आता गोव्यात घडलेल्या या घटनेमुळे १७२ प्रवासी चांगलेच घाबरले आहेत.

इंडिगोचा वैमानिक, अधिकारी यांची सखोल चौकशी करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. तसेच, विमानात देखील नेमका काय बिघाड झाला होता का? किंवा झालेला प्रकार का घडला? याचे कारण शोधण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa khazan Land Regularisation: आता खाजन जमिनीतील बांधकामे होणार नियमित, 2011 अधिसूचनेपूर्वीची बांधकामे कायदेशीर

Goa Cabinet Reshuffle: मंत्रिमंडळ फेरबदलाचा तिढा काही केल्या सुटेना, गृहमंत्री शहांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा

Goa Crime: मुंगूल गँगवॉर प्रकरण, वॉल्‍टरचे दक्षिणेतील वर्चस्‍व भेदण्‍यासाठी केपे-फोंड्यातील 4 गँग एकवटल्या

Rashi Bhavishya 14 August 2025: आरोग्य सुधारेल, कामात वेग आणि उत्साह राहील; आर्थिक लाभ होण्याची शक्यता

WI vs PAK: 18 धावांत 6 विकेट्स...! पाकिस्तानच्या फलंदाजांचा वेस्ट इंडिजच्या 'या' पठ्ठ्यानं उडवला फज्जा; डेल स्टेनचा मोडला 13 वर्ष जुना रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT