Direct Flight to Goa Dainik Gomantak
गोवा

Bhopal to Goa Flight : भोपाळकरांसाठी खुशखबर! सुट्टीसाठी बॅग भरा, 28 ऑक्टोबरपासून गोव्यासाठी थेट विमानसेवा सुरू

New Flight Service : नवीन विंटर शेड्यूल जारी करण्यात आले असून, गोव्याव्यतिरिक्त इतर अनेक शहरांसाठीही अतिरिक्त उड्डाण सेवा चालवल्या जाणार आहेत

Akshata Chhatre

bhopal to goa flight: राजाभोज आंतरराष्ट्रीय विमानतळ, भोपाळ येथून प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आगामी विंटर शेड्यूल अंतर्गत २८ ऑक्टोबरपासून गोव्यासाठी थेट विमानसेवा सुरू होणार आहे. यासोबतच, प्रवाशांना आता दिल्ली आणि हैदराबाद या शहरांसाठीही अतिरिक्त उड्डाण सेवा उपलब्ध होणार आहेत.

विमानतळ संचालक रामजी अवस्थी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, नवीन विंटर शेड्यूल जारी करण्यात आले असून, गोव्याव्यतिरिक्त इतर अनेक शहरांसाठीही अतिरिक्त उड्डाण सेवा या विंटर सीजनमध्ये चालवल्या जाणार आहेत.

गोव्याचे आणि हैदराबादचे वेळापत्रक

इंडिगो एअरलाईन्सद्वारे गोव्यासाठी सुरू होणाऱ्या थेट विमानसेवेमुळे भोपाळकरांसाठी पर्यटनाच्या संधी वाढल्या आहेत. या विमानसेवेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल:

गोवा ते भोपाळ: २८ ऑक्टोबरपासून इंडिगोचे विमान दुपारी २:४० वाजता भोपाळमध्ये दाखल होईल.

भोपाळ ते गोवा: हेच विमान दुपारी ३:२० वाजता गोव्यासाठी परत रवाना होईल.

याचप्रमाणे, हैदराबादसाठीही अतिरिक्त उड्डाण सेवा सुरू होत आहे, ज्यामुळे दोन्ही शहरांदरम्यान आता दोन फ्लाईट्सची सुविधा उपलब्ध होईल.

हैदराबाद ते भोपाळ (6E-7594): विमान सायंकाळी ६:५५ वाजता हैदराबादहून रवाना होईल आणि रात्री ९:०० वाजता भोपाळला पोहोचेल.

भोपाळ ते हैदराबाद (6E-7595): हे विमान भोपाळहून रात्री ९:२० वाजता उड्डाण भरेल आणि रात्री ११:३० वाजता हैदराबादला पोहोचेल.

दुबईसाठी थेट विमानाची मागणी कायम

या सर्व सुविधा उपलब्ध होत असताना, भोपाळहून आंतरराष्ट्रीय उड्डाण कनेक्टिव्हिटीसाठी सध्या इंडिगो एअरलाईन्सने दुबईसाठी थेट विमानाची घोषणा केलेली नाही. इंदूर येथील देवी अहिल्याबाई होळकर विमानतळावरून इंडिगो एअरलाईन्स दुबईसाठी थेट विमानसेवा चालवते. त्यामुळे, भोपाळच्या राजाभोज विमानतळालाही दुबईसोबत थेट कनेक्टिव्हिटी मिळावी, अशी मागणी प्रवाशांकडून गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"26 वर्षे देशाची सेवा केली, आता ओळख विचारताय?" निवडणूक आयोगाच्या नोटिसमुळे खासदार विरियातो संतापले

WPL 2026: गोमंतकीय क्रिकेटरचा ‘डब्ल्यूपीएल’मध्ये कल्ला! दिल्ली कॅपिटल्सला ठोकला रामराम; यूपी वॉरियर्ससोबत नवीन इनिंग

नोकरी सोडली, अयोध्येचे राम मंदिर बनवले; 108 ठिकाणी भ्रमंतीची केली भीष्मप्रतिज्ञा, तुमकूरमधील रामभक्ताची कहाणी

Goa Live News: "सरकारी नोकरी मिळाल्यावर पदाचा गैरवापर करू नका"; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा तरुणांना कडक इशारा

VIDEO: बाप के साये का असर होता है... रस्त्यावर खेळणी विकणाऱ्या वडिलांच्या पायाला धरुन झोपला चिमुकला; हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल Watch

SCROLL FOR NEXT