Goa Housing Projects  Dainik Gomantak
गोवा

Goa Flat Rates Increased : ‘सेकंड होम’मुळे गोव्यातील सदनिकांचे दर भिडले गगनाला

परराज्यातील लोकांची गुंतवणूक; वाढत्या घरभाड्यामुळे फ्लॅट खरेदीत वाढ

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Flat Rates Increased : राज्यात परराज्यातील लोकांची संख्या वाढत आहे. उत्तर भारतीय लोक ‘सेकंड होम’ म्हणून गोव्यात मालमत्ता खरेदी करतात अशी ओरड विरोधी पक्षांकडून सतत होत आहे. ‘सेकंड होम’साठी गोव्याला दिल्या जाणाऱ्या प्राधान्यामुळे येत्या काळात या क्षेत्रात अब्जावधी रुपयांची गुंतवणूक या क्षेत्रात होईल, अशी शक्यता एका नामांकित डेव्हलपर्स कंपनीच्या मालकाने व्यक्त केली आहे.

‘आम्ही सत्तावीस वर्षे या व्यवसायात आहोत. गुंतवणूकदारांची विश्‍वासार्हता आणि जबाबदारी आमच्यावर असल्याने आम्ही योग्य पद्धतीने आलेल्या पैशाचा उपयोग करून त्यांना योग्य पद्धतीने वास्तू किंवा इमारत बांधून देत असतो. गोव्यात पुढील पिढीचा आणि भविष्याचा विचार करून विकास आराखडा तयार केला पाहिजे. गोव्यात सर्व बाजूने मागणी होत असल्यानेच फ्लॅटचे दर वाढलेले आहेत. फ्लॅटचे वाढीव दर हे किनारी भागात तुम्हाला अधिक दिसून येतात’, असे सन इस्टेटचे मालक सूरज मोरजकर यांनी स्पष्ट केले.

शहरात घरांची मागणी वाढल्यानंतर उंच इमारतींशिवाय पर्याय नसतो. पणजीत आता सात ते नऊ मजल्यापर्यंत इमारती होऊ लागल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी लोकांची घरासाठी पसंती अधिक येऊ लागली आहे त्या जागेत इमारती उभारल्या जाऊ शकतात. परंतु गोव्याची ओळख जपण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, त्यासाठी पुढील 30-40 वर्षांचा विचार करून आराखडे तयार करून ते अंमलात आणले पाहिजेत, असंही सूरज मोरजकर म्हणाले.

परराज्यातील लोक गोव्यात फ्लॅट खरेदीच्या माध्यमातून गुंतवणूक करत आहेत. बांधकाम साहित्याचे दरही वाढत आहेत. या व्यवसायासाठी सध्या सहजपणे रेती उपलब्ध होत नाही? अनेक अडचणींचा सामना करूनही स्थानिक बिल्डर अधिक दर लावत नाहीत, परंतु इतर राज्यातील बिल्डर हे सदनिका विक्री करताना अधिक दर लावतात, हे लक्षात घ्यायला हवे, असं राज हाउसिंग डेव्हलपमेंट प्रा. लि., फोंडाचे मालक संदीप निगळ्ये यांनी म्हटलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT