Goa Marra-Pilerne Robbery 24 lakh Five Arrested
राज्यातील वाढत्या दरोड्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी गोवा पोलिस धडक कारवाया करत आहे. यातच आता, मार्रा-पिळर्ण येथे बिस्वास दाम्पत्याला धारदार शस्त्राचा धाक दाखवून तब्बल 24 लाख लाटल्याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी दोन महिलांसह पाच जणांना अटक केली. जॉयसी डिसोझा (मार्रा), कल्पना बर्की (बस्तोडा), इम्रान शेख (बस्तोडा), सुभाष कुमार (कोलवाळ), आणि धीरज गुप्ता (कोलवाळ) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
दरम्यान, सोमवारी (17 मार्च) पहाटे पाच जणांच्या टोळक्याने मार्रा-पिळर्ण येथे भाड्याच्या घरात राहत असलेल्या बिस्वास दाम्पत्याच्या खोलीचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. पुढे त्यांनी बिस्वास दाम्पत्याला धारदार शस्त्राचा धाक दाखवून 24 लाख लाटले, ज्यामध्ये 15 लाखांचे सोन्याचे दागिने आणि 9 लाखांची रोकड लंपास केली. त्यानंतर बिस्वास दाम्पत्याने पोलिस ठाण्यात धाव घेत यासंबंधी तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 310 (2), 127 कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने संशयित दरोडेखोरांची ओळख पटवली. चौकशीतर्गंत पोलिसांनी त्यांच्यावर षड्यंत्र रचत दरोडा घातल्याचा ठपका ठेवला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित जॉयसी डिसोझा ही महिला मार्रा-पिळर्ण येथे बिस्वास दाम्पत्याच्या घराच्या शेजारी राहत होती. यादरम्यान, बिस्वास दाम्पत्याकडे लाखो रुपये आणि दागिने असल्याची जॉयसीला कल्पना होती. विशेष म्हणजे, पीडित दाम्पत्याला ती एकदम गोडीगुलाबीने बोलत. तिनेच तिच्या इतर साथिदारांनी सगळी माहिती पुरवली. त्यांनी मिळून बिस्वास दाम्पत्याला लाटण्याचा कट रचला. या प्रकरणात या पाच संशियतांबरोबर आणखी तीनजण असल्याची माहितीही समोर आली आहे. पर्वरी (Porvorim) पोलिस या तिघांचा शोध घेत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.