Fishing Boats Canva
गोवा

LED Fishing Ban: दंड नको बोट जप्त करा! एलईडी बोटींविरुद्ध मच्छीमार आक्रमक; कर्नाटकातील बेकायदा मासेमारीवर कारवाईची मागणी

Goa Fishing: गोव्याच्या समुद्रात एलईडी दिव्यांचा वापर करणाऱ्या एकाही बोटमालकाविरोधात गेल्या दहा वर्षांत कारवाई झाली नव्हती.

Sameer Panditrao

वास्को: एलईडी दिव्यांचा वापर करून मासेमारी करणाऱ्यांविरोधात गोवा मत्स्योद्योग खात्याने फक्त दंडात्मक कारवाई न करता संबंधित बोट व एलईडी दिवे जप्त करण्याची गरज आहे, असे मत पारंपरिक मच्छीमार बांधवांनी येथे सोमवारी व्यक्त केले.

मस्त्योद्योग खात्याच्या संचालिका यशस्विनी तसेच खात्याने केलेल्या कारवाईचे त्यांनी कौतुक केले व भविष्यातही अशा कारवाया होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

पारंपरिक मच्छीमार ओलंसियो सिमोईस यांनी एलईडी दिव्यांचा वापर करून मच्छीमारी करण्यास प्रतिबंध घालणारा कायदा २०१५ मध्ये देशभरात लागू करण्यात आला. तथापि, गोव्याच्या समुद्रात एलईडी दिव्यांचा वापर करणाऱ्या एकाही बोटमालकाविरोधात गेल्या दहा वर्षांत कारवाई झाली नव्हती.

प्रथमच एक बोट शापोरा किनाऱ्यावर पकडण्यात आली आहे. यावरून गोव्याच्या किनारपट्टीवर एलईडी दिव्यांचा वापर करून मासेमारी केली जात असल्याचे सिध्द होते, असे सांगितले.

यासंबंधीचे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही संबंधित बोटमालक बिनदिक्कतपणे एलईडी दिव्यांचा वापर करून मासेमारी करतात. त्यांना पोलिस, मत्स्योद्योग खाते यांची भीती नसल्याचे दिसून येते. मत्स्योद्योग खात्याने बेकायदा मासेमारी करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची गरज आहे. त्यांना दंड ठोठावून काहीच होणार नाही. त्यांच्या बोटी जप्त करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कर्नाटकातील मच्छीमारांविरुद्ध कारवाईची मागणी

किस्तोदिओ डिसोझा यांनी या कारवाईमुळे आमचा उत्साह वाढला असल्याचे सांगितले. अशा प्रकारच्या कारवाया होण्याची गरज आहे. कर्नाटक व इतर राज्यांतील मच्छीमारी बोटी गोव्याच्या किनारपट्टीवर येऊन मासेमारी करतात. त्यांच्याविरोधात कारवाई होण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे दंडाची रक्कम वाढविण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 16 September 2026: नशिबाची साथ अन् अचानक जॅकपॉट! आज 'या' राशींच्या आयुष्यात घडणार मोठी उलथापालथ; करिअरमध्ये झेप घेण्याची संधी

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

SCROLL FOR NEXT