Nilkanth Halarnkar Dainik Gomantak
गोवा

Goa Fishing: मच्छीमारांवरील प्रश्‍नाला हळर्णकरांकडून बगल, टाळाटाळीच्या भूमिकेमुळे तीव्र संताप; संघटनेचा आंदोलनाचा इशारा

Nilkanth Halarnkar: संघटनेचे अध्यक्ष अग्नेलो रॉड्रिग्स यांनी स्पष्ट शब्दांत सरकारला इशारा दिला की, जर सरकारने आमच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर आम्ही मोठे आंदोलन उभे करू.

Sameer Panditrao

पणजी: गोव्याच्या पारंपरिक मच्छीमारांनी आपल्या १० मागण्यांसाठी सरकारसमोर ठाम भूमिका घेतली असताना, मत्स्यमंत्री नीळकंठ हळर्णकर मात्र पत्रकारांच्या प्रश्नांना बगल देत पळ काढताना दिसले. गुरुवारी मंत्रालयाबाहेर मच्छीमारांच्या मागण्यांवर प्रतिक्रिया विचारली असता, मंत्री हळर्णकरांनी ‘लवकरच बोट घेणार, सरकार लक्ष देत आहे,’ असे अर्धवट उत्तर दिले आणि गडबडीत निघून गेले.

‘गोयचे रापोणकरांचो एकवट’ या संघटनेने पारंपरिक मच्छीमारांच्या संरक्षणासाठी आणि बेकायदेशीर मासेमारीवर कठोर कारवाईसाठी सरकारकडे १० मागण्या सादर केल्या आहेत. मात्र, मंत्री हळर्णकरांच्या टाळाटाळीच्या भूमिकेमुळे मच्छीमारांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. संघटनेचे अध्यक्ष अग्नेलो रॉड्रिग्स यांनी स्पष्ट शब्दांत सरकारला इशारा दिला की, जर सरकारने आमच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर आम्ही मोठे आंदोलन उभे करू.

पत्रकारांनी मंत्री हळर्णकरांना सुरक्षेसाठी बोट कधी घेणार यावर विचारले असता त्यांनी ‘आम्ही लवकरच बोट घेणार, सरकार योग्य ती पावले उचलत आहे,’ असे गुळमुळीत उत्तर दिले. त्यानंतर ते पत्रकारांना टाळत लवकरच निघून गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT