Goa Mackerel Price Dainik Gomantak
गोवा

Goa Mackerel Price : बांगड्यांचा 15 वर्षातील विक्रमी बंपर कॅच; गोव्यातील मच्छिमारांची चांदी

यांत्रिकी बोट मालकांसाठीच नाही तर पारंपारिक मच्छीमारांसाठीही एक चांगला अनुभव

दैनिक गोमन्तक

गोव्यात रोज मासळीच्या किमतीत बदल होत असतात. नुकतेच गोव्यातील मच्छिमारांनी गेल्या 15 वर्षांतील सर्वात मोठा बांगड्याचा बंपर कॅच अनुभवला आहे. यामुळे यांत्रिकी बोट मालकांसाठीच नाही तर पारंपारिक मच्छीमारांसाठीही एक चांगला अनुभव ठरला आहे, ज्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांना नफा कमावता आला आहे. (Goa Fish Price)

समुद्रात मासेमारी करताना वाऱ्याची दिशा महत्वाची भूमिका बाजवते. यावेळी वारेदेखील मच्छिमारांच्या बाजूने होते ज्यामुळे आम्हाला समुद्रात अखंडपणे जाता आले. सध्या, जेटींवर एवढे बांगडे आणले जात आहेत की पिक-अप वाहनांमध्येही जागा नाही, असे एका मच्छीमाराने सांगितले.

गेल्या 15 वर्षात पहिल्यांदाच मासे पकडण्यात एवढी अनुकूलता पाहायला मिळाली. संरक्षणासाठी बर्फ नसल्यामुळे आम्हाला अतिरिक्त मासे फिशमील प्लांटमध्ये पाठवावे लागले असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षीपर्यंत, जेट्टीवरून विक्रेत्यांना एक बॉक्स 6,000 रुपयांना विकला जात होता, या वर्षी 1,200 रुपये प्रति बॉक्सची किंमत आहे.

या बंपर कॅचमुळे किरकोळ बाजारात बांगड्याच्या किमतीत घसरण झाली आहे. 100 रुपयांच्या माफक दरात गेल्या आठवड्यापर्यंत फक्त पाच ते सहा बांगडे मिळत होते, आता त्याच किमतीत 15 किंवा त्यापेक्षा जास्त मासे मिळू लागले आहेत. या हिवाळ्यात विविध प्रकारचे मासे बाजारात आल्याने हा हंगाम उत्तम आहे. बांगडे मुबलक प्रमाणात असल्यामुळे आणि त्याच्या किमती घसरल्यामुळे मोठ्या प्रमाणात विक्री बाजारात सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT