LED fishing Dainik Gomantak
गोवा

Nilkanth Halarnkar: राज्यातील मासे व्यापाऱ्यांची नोंदणी आवश्यक

मत्स्यव्यवसाय विभाग मासळी व्यापारी नोंदणी बंधनकारक करणार: हळर्णकर

दैनिक गोमन्तक

गोवा राज्य मत्स्य विभाग राज्यातील सर्व मासे व्यापाऱ्यांची नोंदणी बंधनकारक करण्याच्या विचारात असल्याची माहिती गोव राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासुन अनधिकृतरित्या मासेमारी सारखे प्रकार समोर आले असल्याने राज्याचा मत्स्यव्यवसाय विभाग हा विचार करत असल्याचं ते म्हणाले.

(goa fisheries minister Nilkanth Halarnkar said Fisheries Dept to make fish trader registration mandatory)

याबाबत बोलताना मंत्री हळर्णकर म्हणाले की, राज्यात अनेक ठिकाणी विनानोंदणी, बेकायदेशीर मासेमारी सुरू असून याला आवर घालणे गरजेचे आहे. यासाठी मत्स्य व्यवसाय या विचारापर्यंत आले असून त्यानुसार मासे व्यापाऱ्यांनी आपली नोंदणी करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

मंत्री हळर्णकर म्हणाले की यापुढे मासेमारीसाठी जेट्टींमध्ये प्रवेश देताना फक्त नोंदणीकृत व्यापाऱ्यांनाच प्रवेश दिला जाईल याबाबतच्या सूचना मी विभागाला दिल्या आहेत. काही मच्छीमार समित्या हा अतिउत्साईपणा वागत असल्याचे समोर आल्याचेही हळर्णकर यांनी सांगितले, बेकायदेशीर मासेमारीचा प्रकार समोर आल्यास कायदेशीररित्या कारवाई केली जाईल असे त्यावेळी त्यांनी सांगितले. तसेच मडगाव येथे सुमारे 40 कोटी खर्च करत एसजीपीडीए मार्केट उभारणार असल्याची माहिती ही यावी मंत्र्यांनी दिली.

यावेळी मंत्री हळर्णकर यांना एलईडी वापरत मासेमारी करणाऱ्यांबाबत विचारले असता याची चौकशी सुरू असून गोवा कोस्टल पोलिसांच्या अहवालानुसार त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असे मंत्री हणर्णकर यांनी सांगितले. त्यामुळे यापुढे राज्यातील सर्व मासे व्यापाऱ्यांना आपली नोंदणी राज्यातील मत्स्यव्यवसाय विभागाकडे करणे आवश्यक ठरणार आहे.अन्यथा कारवाईची शक्यता नाकारता येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT