गोवा

Goa Fish Rate: गोवा राज्यात शंभर रुपयांना पंधरा 'बांगडे'

Goa Fish Rate: मत्सप्रेमी गोमंतकीयांना गेल्या महिन्याभरापासून सुगीचे दिवस आले आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Fish Rate: मत्सप्रेमी गोमंतकीयांना गेल्या महिन्याभरापासून सुगीचे दिवस आले आहेत. मोठ्या प्रमाणात मासळीचे बंपर पीक आल्याने आणि त्यात बांगड्यांचे पीक मोठ्या प्रमाणात आल्याने शंभर रुपयांना चक्क बारा ते पंधरा बांगडे ग्राहकांना विकले जातात. गेल्या आठवड्यात तर 100 रुपयांना वीस बांगडे विकले जात होते.

बांगड्याबरोबरच कर्ली, समुद्री खेकडे, सुंगटे, इसवण, लेपो आदी मासळीही मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहे. मासळी खरेदीसाठी आज पणजी बाजारात ग्राहकांची वर्दळ अधिक होती. गोव्यात अनेक पर्यटक तसेच खवय्ये मासळीपासून बनविलेल्या वेगवगेळ्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी येतात.

राज्यात सर्वत्रच मासळीचे दर समाधानकारक आहेत. मात्र, अजून हॉटेलमध्ये थाळी महागच मिळते. केवळ एक तळलेला बांगडा पणजी शहरात घ्यायचे म्हटले तर 70 ते 80 रूपये आकारले जातात. मासळीचे दर (प्रतिकिलो) बांगडे 100 रु, कर्ली 300 रु, समुद्री खेकडे 300 रु, सुंगटे 300 ते 400 रु, इसवण 500 ते 550 रु, लेपो 300 रु असे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT