Goa Fish  Dainik Gomantak
गोवा

Goan Fish: मासळीतील अतिरिक्त धातू आरोग्यास हानिकारक! समुद्र विज्ञान विभागाचे संशोधन; समुद्रात जाणारे प्लास्‍टिक, धातू रोखण्याची गरज

Goa Fish Metal Contamination: दरम्यान, गोवा विद्यापीठातील संशोधन प्रसिद्ध होताच करंझाळे रापणकार संघटनेने त्वरित बैठक घेऊन निषेध व्यक्त केला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यातील समुद्रात मिळणाऱ्या आणि गोमंतकीय लोक अतिशय चवीने खाणाऱ्या मासळीमध्‍ये अतिरिक्त धातू आढळून येत आहे. या माशांचे दीर्घकाळ सेवन केल्यास आरोग्याशी संबंधित आजार निर्माण होऊ शकतात, असे मत गोवा विद्यापीठातील समुद्र विज्ञान विभागाचे प्रा. महेश्‍वर नास्नोडकर यांनी व्यक्त केले.

पणजीतील करंझाळे समुद्रकिनाऱ्यावर प्रा. महेश्‍वर नास्नोडकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली ‘मासळीत आढळणारे हानिकारक धातू’ यावर विद्यार्थी ए. एम. पाटील आणि सी. जी. फर्नांडिस संशोधनात्मक प्रबंधात मार्गदर्शन करत आहेत.

दरम्यान, गोवा विद्यापीठातील संशोधन प्रसिद्ध होताच करंझाळे रापणकार संघटनेने त्वरित बैठक घेऊन निषेध व्यक्त केला. ‘गोमन्तक’शी बोलताना संघटनेचे अध्यक्ष फ्रान्सिस्को वाझ म्हणाले, मासळी ही काही करंझाळेचीच नसते.

ती सतत फिरतीवर असते. शिवाय मासळीमध्ये काहीना काही प्रकारचे द्रव्य सापडणारच आहे. ही मासळी केवळ करंझाळेतीलच आहे असे अनुमान काढता येणार नाही.

तर, रापणकार संघटनेचे सरचिटणीस मान्‍यूएल म्हणाले की, करंझाळे येथील जमीन हडप करण्याचा काहींचा हा डाव तर नाही ना, असा आम्हाला संशय आहे. परंतु नेता कितीही मोठा असो, त्याला त्‍याचे कारस्थान आम्ही चालवू देणार नाही.

सातत्यपूर्ण संशोधन गरजेचे

मासळीत अतिरिक्त प्रमाणात धातू आढळतात म्‍हणून गोमंतकीयांनी माशांचे सेवन करणे सोडू द्यावे असे नाही. ‘फिश करी राईस’ हे गोमंतकीयांचे पारंपरिक अन्न आहे. माशांमधील अतिरिक्त व आरोग्यास हानिकारक धातू कसे रोखता येतील, हे पाहणे गरजेचे आहे. माशांमध्ये आणि समुद्रसाखळीत जे अतिरिक्त धातू, प्लास्‍टिक ज्या मार्गे येत आहे, ते रोखणे गरजेचे आहे. कारण, आज साधी बाजारातील भाजी घेतली तरी त्यात अतिरिक्त काहीतरी सापडतेच. त्यामुळे कोणत्याही निष्‍कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी सातत्यपूर्ण संशोधन करणे गरजेचे आहे, असे मत प्रा. महेश्‍वर नास्नोडकर यांनी व्यक्त केले.

खारफुटीला प्राधान्य दिले पाहिजे

आपण कोणत्याही एका विशिष्ट किनाऱ्यावरील मासळी ही अधिक हानिकारक आहे असे म्हणू शकत नाही. कारण मासे हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करत असतात. केवळ ‘कालवा’ आदी मासळी एका किनाऱ्यावर अधिक काळ असते. जर आपल्याला समुद्र साखळीतील धातू कमी करावयाचे असतील तर खारफुटी वाढीला चालना देणे गरजेचे आहे व जे राज्यातील सरकार खास करून वन खाते करत आहे. त्‍यामुळे हानिकारक धातू कमी होण्‍यास मदत होईल. सोबतच इतरही उपाय करणे गरजेचे असल्याचे प्रा. नास्नोडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT