Goa Fish Festival  Dainik Gomantak
गोवा

Goa Fish Festival : गोवा फिश फेस्टिवलला सुरुवात, चमचमीत पदार्थांसोबत मनोरंजनाचीही मेजवाणी

दैनिक गोमन्तक

Goa Fish Festival : पारंपरिक मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे, व्यवसायातील नवतंत्रज्ञानाची माहिती व्हावी आणि मत्स्य उत्पादन आणि रोजगार संधी निर्माण व्हावेत, या उद्देशाने मत्स्योद्योग खात्याच्यावतीने आयोजित तीन दिवसीय मत्स्य महोत्सवाची काल मत्स्योद्योग मंत्री नीळकंठ हळर्णकर यांच्या हस्ते सुरूवात झाली. यावेळी खात्याच्या संचालिका शमिला मोंतेरो उपस्थित होत्या.

12 फेब्रुवारीपर्यंत चालणारा हा महोत्सव पणजीतील कांपाल मैदानावर भरवण्यात आला असून विविध गावातील शालेय विद्यार्थ्यांना यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. या महोत्सवात नव्या तंत्रज्ञानाची माहिती देण्याबरोबरच या संदर्भातील प्रशिक्षण दिले जात आहे.

विद्यार्थी आणि नागरिकांना मत्स्यालयाच्या माध्यमातून जिवंत व विविध प्रकारचे मासे बघण्याची संधी मिळत असल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. महोत्सवात पारंपरिक उत्पादन कौशल्य आणि विकास यावर भर दिला जात असला तरी नागरिकांकरिता वेगवेगळे सी फूड स्टॉल उभारण्यात आले आहेत.

तिथेही नागरिकांची गर्दी दिसून येत असून समुद्री अन्नाचा आस्वाद घेत आहेत. याशिवाय अक्वेरीयम मत्स्य पालन, त्यासाठी लागणारे साहित्य यांच्या वेगवेगळ्या स्टॉल बरोबर मत्स्य विभागात काम करणाऱ्या संशोधन संस्था सहभागी झाल्या आहेत.

यात केंद्रीय कृषी संशोधन संस्था, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था, भूखंडीय जल व्यवस्थापन संस्था केंद्रीय फिशरी यांच्यासह मत्स्य उत्पादन आणि पैदास क्षेत्रात काम करणाऱ्या देशभरातल्या अनेक संस्था, उत्पादक, व्यवसायिक, शेतकरी यात सहभागी झाले आहेत.

‘सी फूड’चा आस्वाद

तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात गोव्याबरोबरच शेजारील राज्यातून सी फूड स्टॉल आले असून तिथे मासे, खेकडे, कोळंबी, झिंगे आदींपासून बनवलेले अनेक चमचमीत पदार्थ ठेवण्यात आले आहेत. सोबतीला मनोरंजनासाठी देखणी , कुणबी सारख्या लोकनृत्य आणि लोककला सादर करण्यात येत आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी महोत्सवाला मोठी गर्दी आहे.

पारंपरिक मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठीच्या राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांची माहिती महोत्सवामार्फत लोकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. समुद्री अन्न (सी फूड) संदर्भात जनजागृती व्हावी, हा उद्देश या महोत्सवामागे आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. -नीळकंठ हळर्णकर , मत्स्योद्योग मंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Goa Marine Projects: ..गोव्यात अखेर '23 प्रकल्‍पांची' मान्यता रद्द! रोजगार तसेच कोटींच्‍या गुंतवणुकीवर पाणी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT