Sports: ...तर क्रिकेटप्रमाणेच इतर क्षेत्रांतही भारत श्रेष्ठ बनेल !

भारतात इतर क्षेत्रांमध्येही क्रिकेटचे अनुकरण व्हायला हवे,असे मत ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री राजदीप सरदेसाई यांनी व्यक्त केले.
Sports |
Sports |Dainik Gomantak
Published on
Updated on

Sports: सुरवातीच्या 40-50 वर्षांच्या तुलनेत क्रिकेटने भारतात कित्येक पटीने प्रगती केली आहे. क्रिकेटमध्ये भारत जगात पहिल्या क्रमांकावर पोहचू शकतो, कारण या खेळात जाती-धर्माचा विचार न करता सर्वांना समान संधी दिली जाते. भारतात इतर क्षेत्रांमध्येही क्रिकेटचे अनुकरण व्हायला हवे,असे मत ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री राजदीप सरदेसाई यांनी व्यक्त केले.

मडगावात गोमंत विद्या निकेतन आयोजित विचार वेध व्याख्यानमालेत ते आज दत्तात्रय एन. हेमाडी स्मृती तिसरे पुष्प गुंफत होते. खरी लोकशाही ही समान संधीवर आधारीत आहे. सर्व भारतीयांना उन्नती साधण्याची, विचार करण्याची, मोठी स्वप्ने बघण्याची समान संधी मिळायला हवी.

Sports |
Mahadayi River: घरोघरी लागणार पणत्या; म्हादईप्रश्नी सरकारला जागे करण्यासाठी अनोखा उपक्रम

राजदीप सरदेसाई यांनी आपल्या व्याख्यानाची सुरवात त्यांचे वडील, माजी क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांच्या उल्लेखाने केली. ते म्हणाले की, क्रिकेटमध्ये केवळ प्रतिभा महत्वाची असते. क्रिकेटमध्ये कौटुंबिक वशिलेबाजी, पक्षपाताला जागा नाही.

पण राजकारणात अशा प्रकारच्या पक्षपाताला मान्यता आहे. लोकसभेतील कितीतरी खासदार हे त्यांचे राजकारणी पूर्वज, वडील, बंधू यांच्या आशीर्वादाने झालेले आम्ही पाहतो.

पूर्वी क्रिकेटवर केवळ देशातील काही प्रमुख शहरातील खेळाडूंचेच वर्चस्व असायचे. पण आता परिस्थिती बदललेली आहे. आता केवळ प्रतिभा पाहिली जाते.

Sports |
Accident News: साळ येथे सासरा-सुनेवर अंत्यसंस्कार

लहान शहरातील, गावातील खेळाडूही देशाचे प्रतिनिधित्व करू शकतात, असे सांगून त्यांनी महेंद्र सिंग धोनी, कपिल देव यांचे उदाहरण दिले. क्रिकेट किंवा कुठल्याही क्रीडा प्रकारात शॉर्टकटला मुळीच थारा नसतो,असेही सरदेसाई म्हणाले.

फुटबॉलला योग्य पाठिंबा मिळाला नाही !

मात्र, क्रिकेटप्रमाणे फुटबॉलला देशात योग्य तो पाठिंबा, स्थान मिळाले नाही,याची खंत आहे. याचे कारण फुटबॉलला स्वार्थी प्रशासक लाभले. त्यांनी मायबाप संस्कृती सोडली असती, तर कदाचित फुटबॉलला चांगले दिवस लाभले असते, असे राजदीप सरदेसाई यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com