Kidney Transplant Dainik Gomantak
गोवा

Kidney Transplant: गोव्यात प्रथमच 'स्वॅप किडनी ट्रान्सप्लांट' यशस्वी; 2 जोडप्यांतील मूत्रपिंडांच्या अदलाबदलीतून रुग्णांना नवजीवनाची आशा

Goa First Swap Kidney Transplant: मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात गोव्याने महत्त्वपूर्ण वैद्यकीय यश संपादन केले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात गोव्याने महत्त्वपूर्ण वैद्यकीय यश संपादन केले आहे. जुने गोवे येथील हेल्थ वे रुग्णालयात राज्यातील पहिले ‘स्वॅप किडनी ट्रान्सप्लांट’ (परस्पर मूत्रपिंड अदलाबदल प्रत्यारोपण) यशस्वीपणे करण्यात आले. या प्रक्रियेमुळे मूत्रपिंड निकामी झालेल्या दोन रुग्णांना त्यांच्या जोडीदाराऐवजी दुसऱ्या जोडप्यातील दात्याकडून मूत्रपिंड मिळाले. या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असून प्रत्यारोपित मूत्रपिंडे व्यवस्थित कार्यरत आहेत.

या शस्त्रक्रियेत ३२ ते ३६ वयोगटातील दोन विवाहित जोडप्यांचा सहभाग होता. दोन्ही जोडप्यांमध्ये पती किंवा पत्नी आपल्या जोडीदाराला मूत्रपिंड दान करण्यास इच्छुक होते. मात्र, वैद्यकीय कारणांमुळे त्यांचे मूत्रपिंड जोडीदाराला प्रत्यारोपित करणे शक्य नव्हते. एका जोडप्यात पती-पत्नीचे रक्तगट वेगवेगळे होते, तर दुसऱ्या जोडप्यात मूत्रपिंड स्वीकारणाऱ्या रुग्णाच्या शरीरात दात्याच्या मूत्रपिंडाला नाकारू शकणाऱ्या प्रतिपिंडांची (अँटिबॉडीज) निर्मिती झाली होती.

त्यामुळे थेट प्रत्यारोपणात अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे दोन्ही जोडप्यांमध्ये मूत्रपिंडांची अदलाबदल करून प्रत्यारोपण करण्यात आले. या वैद्यकीय पथकात डॉ. मधुमोहन प्रभुदेसाई, डॉ. नीलेश तळवडकर आणि डॉ. सारंग काणेकर, भूलतज्ज्ञ डॉ. संजीव जुवारकर, डॉ. भारती सावंत, डॉ. संदीप पवार आणि डॉ. निखिल भूमकर, डॉ. शितल लेंगाडे आणि डॉ. सिंधू अर्जुन यांचा समावेश होता.

मूत्रपिंड प्रत्यारोपणातील अभिमानास्पद घटना

रुग्णालयातील मूत्रपिंडविकारतज्ज्ञ डॉ. शितल लेंगाडे यांनी सांगितले की, गोव्यातील मूत्रपिंड प्रत्यारोपण क्षेत्रासाठी ही अभिमानास्पद आणि महत्त्वपूर्ण घटना आहे. दोन्ही रुग्णांच्या कुटुंबीयांमध्ये मूत्रपिंड दान करण्यास इच्छुक व्यक्ती होत्या; मात्र वैद्यकीय विसंगतीमुळे थेट दान शक्य होत नव्हते. स्वॅप प्रत्यारोपणामुळे ही अडचण दूर करता आली. कुटुंबातील दात्याचे मूत्रपिंड जुळत नसले तरी परस्पर मूत्रपिंड अदलाबदलीच्या माध्यमातून प्रत्यारोपण शक्य होऊ शकते, हा संदेश या यशस्वी शस्त्रक्रियेतून मिळतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Imran Khan: 'इम्रान खान यांना तात्काळ सोडा', UN मानवाधिकार प्रमुखांनी केली मोठी मागणी; आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकड्यांची कोंडी

Cockroach Janata Party: नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन करणारे सीजेपीचे अभिजीत दीपके गोव्यात; तरुणाईशी साधणार संवाद

Noise Pollution: नरकासुर कलेला प्रोत्साहन, ध्वनिप्रदूषणाला लगाम; गोवा खंडपीठाचे महत्त्वपूर्ण निर्देश

Budh Gochar 2026: 4 डिसेंबरपासून 'या' 4 राशींचा सुवर्णकाळ सुरु! बुध गोचरमुळे होणार तगडा फायदा; चांगल्या दिवसांची नांदी

Goa Equality Index 2026: 28 राज्यांत गोवा नंबर 1! आरोग्य, मूलभूत सुविधा आणि समान संधींच्या निर्देशांकात बाजी

SCROLL FOR NEXT