Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'गोवा फर्स्ट'चा नारा पुन्हा बुलंद! धर्मनिरपेक्ष आघाडीसाठी समविचारी पक्षांना एकत्र आणणार; गोवा फॉरवर्डची भूमिका स्पष्ट

Goa First Secular Alliance: गोवा विधानसभा निवडणुकीला काही महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडींना सुरुवात झाली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीला काही महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडींना सुरुवात झाली आहे. भाजप वगळता इतर विरोधी पक्षांत हालचालींना वेग आला आहे. ‘गोवा फॉरवर्ड’ने पुन्हा अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. ‘गोवा फर्स्ट’ हे पक्षाचे मूळ धोरण कायम ठेवले आहे. तसेच जनतेला विश्वासार्ह व समविचारी शक्तींना एकत्र आणताना धर्मनिरपेक्ष आघाडीसाठी पक्ष कटिबद्ध असल्याचे ‘गोवा फॉरवर्ड'ने समाजमाध्यमांद्वारे जाहीर केले आहे.

काँग्रेसने भूमिका बदलल्याने आणि आघाडीची सर्व कवाडे खुली असल्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर गोवा फॉरवर्डविषयी काँग्रेसने नमते धोरण स्वीकारल्यानेही फॉरवर्ड आणि ‘आप’ला बरोबर घेण्याविषयी काँग्रेस विचार करीत असल्याचे प्रथमदर्शनी तरी सध्या दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे संभाव्य आघाडी तथा युती होणार असल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर गोवा फॉरवर्डने समाजमाध्यमांवर पोस्ट शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गोव्याला एक विश्वासार्ह, सर्वसमावेशक आणि लोककेंद्री पर्याय देणे हेच पक्षाचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यासाठी सर्व समविचारी धर्मनिरपेक्ष पक्षांना एका व्यासपीठावर आणणे गरजेचे असल्याचे पक्षाने म्हटले आहे.

गोव्याच्या व्यापक हितासाठी सर्व समविचारींनी एकत्र येणे ही केवळ पक्षाची राजकीय प्राथमिकता नसून ती एक महत्त्वाची सामाजिक जबाबदारी आहे, असेही फॉरवर्डने पोस्टमध्ये नमूद केले आहे. त्यामुळे येत्या काळात धर्मनिरपेक्ष आघाडी बळकट करण्याच्या दृष्टीने पक्ष पावले उचलेल, असे स्पष्ट संकेत या निवेदनाद्वारे मिळाले आहेत.

चर्चा करूनच युतीचा निर्णय!

गोव्यातील सत्तेतून भाजपला बाहेर काढण्यासाठी सर्व समविचारी विरोधी पक्षांनी एकाच व्यासपीठावर एकत्र यावे, हीच जनतेची तीव्र इच्छा आहे. याच पार्श्वभूमीवर गोवा फॉरवर्ड आणि आम आदमी पक्ष (आप) यांची युती झालेली आहे. काँग्रेसनेही अद्याप युतीची दारे खुली ठेवली आहेत. त्यामुळे पक्षात सखोल चर्चा करून काँग्रेससोबतच्या युतीबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे गोवा फॉरवर्डचे प्रवक्ते प्रशांत नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

SCROLL FOR NEXT