Beef shop Dainik Gomantak
गोवा

Goa First: तीन आठवडे उलटले तरी 'त्या' गोमांस दुकानावर कारवाई नाहीच

वास्कोतील त्या दुकानावरील कारवाईसाठी 'गोवा फर्स्ट' आक्रमक

दैनिक गोमन्तक

वास्को: वास्को दत्रात्रेय मार्गाच्या बाजूस असलेल्या मुरगाव नगरपालिका मार्केटमध्ये गोमास दुकान (बिफ सेंटर) 2005 पर्यंत शौचालय होते. या शौचालयाचे रूपांतर गोमांस दुकानात करण्यात आले आहे. यात पालिकेने भ्रष्टाचार केल्याचा आरोप गोवा फर्स्ट बिगर सरकारी संस्थेचे निमंत्रक परशुराम सोनुर्लेकर यांनी केला आहे.

(Goa First NGO has demanded action against the beef shop in Vasco)

गोवा फर्स्ट बिगर सरकारी संस्थेने मुरगाव तालुक्यात आजपर्यंत विविध विषयावर आवाज उठवला आहे. गेल्या महिन्यात वास्को दत्तात्रय मार्गाच्या बाजूस मुरगाव नगरपालिकेच्या मार्केटमधील बेकायदेशीररित्या शौचालयाचे रूपांतर गोमांस दुकान केल्याची तक्रार मुख्याधिकारी व राज्य पालिका संचालकांकडे गोवा फर्स्टचे निमंत्रक परशुराम सोनुर्लेकर यांनी केली होती.

गोवा फर्स्टने ही तक्रार दाखल करून तीन आठवडे झाले तरी पालिकेच्या मार्केटमध्ये शौचालयाच्या जागी उभारलेले गोमांस दुकानावर मुरगाव नगरपालिकेने काहीच कारवाई केली नाही. अशी माहिती परशुराम सोनुर्लेकर यांनी दिली आहे. पालिका मुद्दामहून त्या गोमांस दुकानावर कारवाई करीत केली नाही. म्हणूनच पालिकेचे अधिकारी वर्ग भ्रष्टाचारात गुंतलेला असल्याची टीका सोनुर्लेकर यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: पुढचे 5 दिवस पावसाचे! राज्यात ‘यलो अलर्ट’ जारी; तीव्रता वाढण्याची शक्यता

Goa Education: शिक्षणाचा 'विजय'! GECच्या 35 प्राध्यापकांची कामावर वापसी; सरदेसाईंनी करून दाखवले

AFC Champions League: FC Goaची लागणार कसोटी, अल सीबविरुद्ध रंगणार सामना

Ganesh Chaturthi 2025: '40 वर्षांची' परंपरा, 2 महिने गाव सोडून करतात गणेशभक्तांची सेवा; पेडण्यात होते चर्मवाद्यांची दुरुस्‍ती

Goa Live News: 5 दिवस पाऊस राहणार कायम

SCROLL FOR NEXT