Airlines
Airlines Dainik Gomantak
गोवा

पर्यटन हंगामातील पहिले चार्टर विमान डिसेंबरमध्ये गोव्यात उतरणार

Dainik Gomantak

Goa: कोविडनंतर (Covide-19 Epidemic) मरगळ आलेल्या गोव्यातील पर्यटन व्यवसायासाठी मोठी खुशखबर आहे! गोव्यातील बंद पडलेले चार्टर पर्यटन (Charter tourism) येत्या डिसेंबर महिन्यापासून पुन्हा सुरू होत आहे. रशियन देश असलेल्या कझाकिस्तानमधून डिसेंबरपासून दर आठवड्याला एक चार्टर विमान (Charter Airlines) गोव्यात येणार आहे.

रशियन पर्यटकांना (Russian Tourist) गोव्यात आणणाऱ्या मिनार ट्रॅव्हल्स (इंडिया) या कंपनीकडून हे पर्यटक गोव्यात आणले जाणार आहेत. रशियनांसाठी गोवा हे अत्यंत आवडीचे आणि पसंतीचे पर्यटन स्थळ आहे.

कझाकिस्तानमधून पहिले चार्टर विमान 9 डिसेंबरला गोव्यात पोहोचणार आहे. त्यानंतर प्रत्येक आठवड्याला एक विमान पाठवले जाईल, याची खात्री आम्हाला दिली आहे, अशी माहिती मिनारच्या उपाध्यक्ष अबिदा कुमार यांनी दिली.

गोव्यात येणारे अर्धे आंतरराष्ट्रीय पर्यटक रशियन असतात. त्याशिवाय कॉमनवेल्थ समूह देशातील पर्यटकही गोव्यात येत असतात. त्यात ब्रिटिश पर्यटकांची संख्या अधिक असते.

13 डिसेंबरनंतर ब्रिटिश चार्टर सेवा

ब्रिटनमधून डिसेंबरच्या मध्यास पर्यटक गोव्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. बहुतेक पाहिले ब्रिटिश चार्टर विमान 13 डिसेंबरला गोव्यात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जाते. याचे कारण म्हणजे भारतात येण्यासाठी ब्रिटनमध्ये लोकांना व्हिसा देणे सुरू झाले आहे. गोव्यात चार्टर पर्यटन सुरू होणे ही आनंदाची बाब आहे. कारण गोव्यातील बहुतेक आदरातिथ्य व्यवसाय या चार्टर पर्यटकांवरच अवलंबून असतो. चार्टर पर्यटक गोव्यात येणे परत सुरू झाल्यास गोव्याच्या पर्यटन उद्योगाला पुन्हा झळाळी येईल, अशी प्रतिक्रिया या क्षेत्रातील उद्योजकांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Netravali: कदंबच्या 'त्या' कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करणार : वनमंत्री राणे

Yellow Alert In Goa: गोव्यात दोन दिवस यलो अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Mukesh Ambani: मुकेश अंबानी लवकरच करणार 150 अब्ज डॉलर्सच्या मार्केटमध्ये एन्ट्री? ‘या’ क्षेत्रात आजमावणार हात

गोव्यात लवकरच AI द्वारे होणार फुफ्फुसाच्या कर्करोगाची तपासणी, आरोग्य मंत्र्यांची माहिती

Cancer News : फुफ्फुसाच्या कर्करोगाची गोमेकॉत साधनसुविधा

SCROLL FOR NEXT