Goa fire news Dainik Gomantak
गोवा

Goa News: घर जळाले, संसाराची राख रांगोळी झाली; हातावर पोट असणारी मायलेक बेघर

Sanguem Fire Case: घरावर सिमेंट पत्र्याचे छत. घरात कमाविणारी अशी कोणीच नसून दोघांची शारीरिक स्थिती बिकट आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

सांगे: सिलिंडर स्फोट होऊन भडकलेल्या आगीत बुधवारी (ता. २३) उत्तर रात्री दीड वाजता घर भस्मसात झाल्याने माय, लेक बेघर झाले आहेत. जळालेल्या घराच्या अवशेषांसमोर बसून धाय मोकलून रडण्याशिवाय पर्याय श्रीमती रोहिदास गावकर या विधवेसह तिची कन्या तेजासमोर राहिला नाही. मोलमजुरीवर गुजराण करणाऱ्या दोघींचे घर जळाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सविस्तर माहितीनुसार, वेळीपवाडा विळीयण भाटी सांगे येथील श्रीमती रोहिदास गावकर व तिची कन्या तेजा या दोघांचे कुटुंब. घरावर सिमेंट पत्र्याचे छत. घरात कमाविणारी अशी कोणीच नसून दोघांची शारीरिक स्थिती बिकट आहे. परिणामी शेजारी देतील ते खावे, अशी स्थिती असताना रात्रीचे जेवण करून शेजाऱ्यांच्या घरात झोपणे हा नित्यक्रम आहे.

बुधवारी पहाटे दीड च्या सुमारास घरात कोणी नसताना आग लागली. आगीच्या आवाजाने शेजारी कृष्णा भंडारी जागा होऊन बाहेर आला असता घर जळून खाक झाले होते. त्यात गॅस सिलिंडर फुटल्याने आगीचा भडका उडून सर्व काही जळून राख रांगोळी झाली. कृष्णा भंडारी यांनी रात्रीच कुडचडे अग्निशमन दल आणि सांगे पोलिसांना पाचारण केले.

पण त्या आधीच सर्व काही संपले होते. या दुर्घटनेमुळे अंगावरील कपड्यांशिवाय एकही वस्तू शिल्लक राहिलेली नाही. एकमेव अशा लोखंडी कपाटात काही कपडे, एक सोनसाखळी, रोख रक्कम, कर्णफुले ती सुद्धा जळून राख झाली. घरात असलेली कागदपत्रेही जळून खाक झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vote Chori: गोव्यात सापडले नेपाळी मतदार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांचा Ground Survey

Asia Cup 2025: संजू सॅमसन नाही, KL राहुल नाही; आशिया कपबाबत मोठी बातमी, माजी खेळाडूने केला खुलासा

Pirna Nadoda: वाढदिवसादिवशी बाहेर पडला, नंतर सापडला कुजलेला मृतदेह; 25 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू

Petrol Diesel Prices In Goa: लॉंग विकेंडला गोव्यात जाताय? पेट्रोल-डिझेलचे ताजे दर जाणून घ्या..

Goa Live Updates: 'गोविंदा रे गोपाळा..!'. डिचोलीतील विविध शाळांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी

SCROLL FOR NEXT